मिक्स डाळीचे आप्पे (Mix Daliche Aape in marathi)

 

मिक्स डाळीचे आप्पे (Mix Daliche Aape in marathi)

 

      मिक्स डाळीचे आप्पे हे वेगवेगळ्या डाळी पासून बनवलेले   असतात. आणि ते खायला  रुचकर व खूप पौष्टिक असतात. हे अप्पे वेगवेगळ्या डाळीने बनवले असल्यामुळे त्यामध्ये खूप प्रोटीन्स फायबर असते. आणि लहान मुले हे आवडीने खातात. वरण-भात पोळी भाजी रोज रोज खात असतो मग आपल्याला एखादे दिवशी काहीतरी वेगळं खावंस वाटतं तेव्हा आपण खूप वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत असतो. चला तर मग आपण एखाद्या दिवशी आप्पे पण बनवून बघूया.

 

आप्पे बनवण्यासाठी कोणते कोणते साहित्य लागतात ते बघूया.

 

साहित्य:-

 १) दोन वाटी तांदूळ

 २) अर्धी वाटी चणाडाळ

 ३) अर्धी वाटी उडद सोला डाळ 

 ४) अर्धी वाटी मसूर डाळ

 ५) अर्धी वाटी मुगाची डाळ

 ६) मीठ

 ७) एक कांदा

 ८) एक टमाटर

 ९) दोन हिरवी मिरची

 

  आता आपण आप्पे कसे बनवायचे ते बघूया

 

स्टेप १)- आप्पे बनवण्यासाठी सर्वप्रथम सर्व डाळी एकत्रित करून घ्यायचे. म्हणजेच दोन वाटी तांदूळ, अर्धी वाटी चणाडाळ, वाटी उडद  सोला डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी मुंगीची  डाळ इत्यादी. 

 

स्टेप २)- सर्व डाळी एकत्र मिक्स करून त्याला छान दोन-तीन पाण्याने धुऊन घ्यायच आहे. आपल्याला अप्पे उद्याला खायचे असेल तर सर्व डाळी आजच सकाळी भिजवून ठेवायचे. नंतर त्या भिजवून ठेवलेल्या मिक्स डाळी संध्याकाळी मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट तयार करून घ्यायची आहे. सादर पेस्ट रात्रभर तसंच फर्मेंटेशन होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. 

 

स्टेप ३)- दुसऱ्या दिवशी सकाळी या मिश्रणामध्ये एक कांदा बारीक कापून टाकायचा. आणि आणखी एक टमाटर बारीक कापून टाकायचे तसेच हिरवी मिरचीची पेस्ट व मीठ चावी नुसार  टाकायची आहे.  छान फिरवून घेतल्यानंतर आप्पे पात्राला तेल लावून आप्पे बनवून घ्यायचे.

 

टिप :-  यामध्ये आपण कांदा, टमाटर याच्या व्यतिरिक्त आणखीन काही भाज्या टाकू शकतो जे आपल्याला आवडतील अशे  गाजर, शिमला मिरची, पत्ता गोबी हे सुद्धा टाकल्याने याची चव खूप छान येते. लहान मुलांसाठी पण ते खूप पौष्टिक असते. 

 

आता आपण चटणी बनवण्यासाठी काय साहित्य लागतात ते बघूया.

साहित्य:- 

१) शेंगदाणे 

२) खोबरा

३) दही

४) मीठ

५) साखर

६) कढीपत्ता

७) दोन हिरव्या मिरच्या

८) दोन लसूण पाकळ्या

९) जीरा

 

आता आपण शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते बघू

स्टेप १)- चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आहे. 

स्टेप २)- एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे त्यामध्ये थोडा खोबऱ्याचे तुकडे, मीठ दोन हिरव्या मिरच्या, दही, कढीपत्ता, साखर थोडीशी जिरा आणि लसूण पाकळ्या टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. 

स्टेप ३)- बारीक केलेला मिश्रणाला एका भांड्यामध्ये फोडणी देण्यासाठी काढून घ्यायाच आहे. नंतर गॅसवर एका भांड्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये मोहरी तडतडू द्यायची आणि ती कडक फोडणी मिश्रणामध्ये घालायच. अशाप्रकारे आपली चटणी बनवून तयार झाली.

 

Leave a comment