सिम्पल चिकन करी रेसिपी (Simple Chicken Curry Recipe in Marathi) (Best Chicken Curry Recipe in Marathi)

 सिम्पल चिकन करी रेसिपी 

(Simple Chicken Curry Recipe in Marathi)

  (Best Chicken Curry Recipe in Marathi)

     

             चिकन करी म्हटलं की लहान मोठे सगळ्यांना खूप आवडते. सगळ्यांची चिकन करी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि कुणाला ग्रेव्ही पाहिजे कुणाला तरी पाहिजे कुणाला सुखी पाहिजे खूप वेगवेगळ्या पद्धतीने चिकन खाल्ली जाते. कोणाला भाकरी सोबत खायला आवडते, कोणाला पोळी सोबत खायला आवडते. पण चिकन म्हणताच तोंडाला पाणी सुटायला लागते हे नक्की. बहुतेकदा आपल्या घरी जेव्हा पाहुणे येतात तेव्हा आपण त्यांच्यासाठी खास चिकनचा बेत केलेला असतो.  चिकन खूप छान झाली तर ते सुद्धा खूप तारीफ करीत असतात.  चिकन मध्ये पण खूप प्रकार असतात गावठी चिकन, हैदराबादी चिकन, बॉयलर, काकलर्स तर आपण आज गावठी चिकन simple chicken curry recipe कशी बनवायची ते बघूया.

चिकन करी  simple chicken curry recipe बनवण्यासाठी कोण कोणते साहित्य लागतात ते बघूया. 

साहित्य:-

           १) अर्धा किलो गावठी चिकन

           २)  एक कांदा

           ३) एक टमाटर

मसाल्यासाठी लागणारे साहित्य :-

           १) धने

           २) जीरा

           ३) लसूण पाकळ्या नऊ दहा

           ४) एक अद्रक तुकडा

           ५) एक भेंडी विलायची

           ६) एक छोटी विलायची

           ७) दोन लवंग

           ८) खसखस

           ९) शहाजीरा

         १०) कलमी

         ११) दगडफूल

         १२) कर्णफुल

         १३) शेंगदाणे

         १४) दाडया

         १५) एक कांदा

         १६) खोबऱ्याचा तुकडा

आता आपण chicken curry recipe करीत मसाला कसा तयार करायचा ते बघूया

स्टेप १)– सर्वात आधी आपण तव्यावर थोडासा तेल टाकून कांदे भाजून घेऊया आणि गॅस वरती खोबऱ्याचा तुकडा भाजून घेऊया. 

स्टेप २)- कांदा आणि खोबरा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊन आणि त्याच गॅसवर ठेवलेल्या तव्यावर थोडेसे  तेल टाकून धने, जिरा, लवंग, विलायची, मोठी विलायची, कलमी, दगडफूल, खसखस, शेंगदाणे, डाळया, शहाजीरा, कर्णफळ यांना तव्यावरती भाजून घ्यायचं आहे. 

स्टेप ३)– सर्व मसाले तव्यावर भाजून झाल्यानंतर कांदा खोबरा आणि सर्व मसाले मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायच आहे.  बारीक केलेले मसाले दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्याच आहे.

स्टेप ४)– मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण आले लसणाची पेस्ट तयार करून घेऊया. आता सर्व मसाले तयार करून झालेले आहे.  आता आपण चिकन रेसिपी कडे वळूया.

आता आपण simple chicken curry recipe कसे बनवायचे चिकनला फोडणी कशी द्यायची ते आपण बघूया.

स्टेप १)- सर्वात आधी आपण चिकन बनवण्यासाठी एक मोठा कांदा बारीक कापून घेऊया. गॅस वरती एक कढई ठेवू त्या कढईमध्ये चार ते पाच टेबलस्पून तेल टाकून घेऊया.  तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये सर्वात आधी कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. 

स्टेप २)- कांदा लालसर होईपर्यंत आपण चिकन व्यवस्थित धुवून घेऊ. कांदा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आता आले लसणाची पेस्ट टाकून छान परतून घ्यायचे आहे. 

स्टेप ३)- आलं लसणाची पेस्ट छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेली मसाल्याची पेस्ट टाकून छान परतून घ्यायचे आहे . 

स्टेप ४)- मसाल्याची पेस्ट तेलामध्ये थोडावेळ परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक टमाटर कापून टाकायचा आणि नंतर त्यामध्ये हळद, तिखट, मीठ टाकून व्यवस्थित त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. मसाला जळू नये म्हणून त्यामध्ये थोडेसे पाणी टाकायचे आहे  आणि मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. 

स्टेप ५)- मसाला व्यवस्थित परतून त्यामध्ये तेल सुटायला लागलं की चिकन टाकायचं आहे. पाणी न सोडता मसाल्यामध्ये तसच चिकन शिजू द्यायच आणि थोड्या थोड्या वेळाने त्याला फिरवत राहायचं आहे. 

स्टेप ६)- चिकन अर्ध शिजत आल्यानंतर त्याला व्यवस्थित चेक करायचं आणि नंतर आपल्याला हवं तेवढं पाणी घालायच खूप जास्त पाणी घालायची गरज नाही थोडी  ग्रेव्ही छान वाटते. खूप घट्ट पण ठेवायचं नाही त्याला शिजून थोडी  ग्रेव्ही असेल इतकं पाणी घालायचं आणि ते व्यवस्थित शिजवून झाल्यानंतर त्यावरती तेल सुटलेलं असल पाहिजे. 

स्टेप ७)- चिकन पूर्ण शिजवून झाल्यानंतर त्याला वरून कोथिंबीर टाकून सर्व्ह करायचं. चिकनला आपण भाकरी सोबत खाऊ शकतो, पोळी सोबत सुद्धा खाऊ शकतो.

 

टीप :- जेव्हा आपण simple chicken curry बनवण्यासाठी मसाला तयार करतो त्या मसाल्यामध्ये शिजवताना जर मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेला वाटण असते त्यामध्ये थोडेसे पाणी घालून ते जर शिजवताना मसाल्यामध्ये टाकल तर मसाला जळत पण नाही आणि त्याला खूप छान तेल सुटायला लागते. आणि आणखी एक की तुम्ही टमाटरची प्युरी करून टाकू शकता किंवा टमाटर बारीक कापून सुद्धा टाकू शकता.

Leave a comment