मटर पालक पनीर रेसिपी पालक पनीर रेसिपी
(Matar Palak Paneer Recipe in Marathi)
आज आपण बनवणार आहोत मटर पालक पनीर रेसिपी पनीरची रेसिपी हि रेसिपी सगळ्यांना खूप आवडते. शक्यतो लहान मुलांना पनीर खूप आवडतो लहान मुलं आवडीने पनीर खातात जे आपण पनीरचे तुकडे फ्राय करतो त्याला सुद्धा मुले खूप आवडीने खातात पनीर मध्ये खूप प्रोटीन्स असते त्यामुळे लहान मुलांच्या वाढीसाठी पनीर खूप फायद्याचे ठरते. पनीर खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते मसाला पनीर किंवा पालक पनीर तर आज आपण मटर पालक पनीर कशी बनवतात ते बघूया.
पालक पनीर रेसिपी साठी लागणारे साहित्य
साहित्य:-
1) पनीर 200 ग्राम
2) पालक दोन जुडी
3) एक कांदा
4) एक टमाटर
5) सात-आठ लसूण पाकळ्या
6) एक अद्रक तुकडा
7) एक तेज पत्ता
8) धने पावडर
9) जिरा पावडर
1o) गरम मसाला
11) कोथिंबीर
12) फ्रेश क्रीम
13) दोन हिरवी मिरची
14) कस्तुरी मेथी
15) लाल तिखट
16) हळद पावडर
17) मीठ
18) तेल
19) मटर एक वाटी
Matar Palak Paneer Recipe बनवण्याची पद्धत
स्टेप 1)- मटर पालक पनीर बनवण्यासाठी सर्वात आधी आपण गरम पाणी करायला ठेवायचा पाणी उकडायला लागला की त्यामध्ये पालकची पाने टाकायचे.
स्टेप २)– पालकची पाने दोन मिनिटे उकडल्यानंतर एका बाऊलमध्ये बर्फाचे तुकडे टाकून थंड पाणी घ्यायचा त्यामध्ये उकडलेले पालकची पाने उकडल्याबरोबर लगेचच त्यामधून काढून बर्फाच्या पाण्यात टाकायचा.
स्टेप 3)- पालकची पाने बर्फाच्या पाण्यामधून काढून मिक्सरच्या भांड्यात टाकायचा त्यामध्ये कोथिंबीर टाकून त्याचा वाटण करून घ्यायचा.
स्टेप ४)- एक वाटी ताजे मटार उकळून घ्यायचे जर का मटर फ्रोजन असतील तर उकळण्याचे गरज नाही ते भाजीमध्ये टाकता येईल.
स्टेप ५)– नंतर गॅस वरती कढई ठेवून त्यामध्ये थोडेसे तेल टाकायचे आणि सात-आठ लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरची, अद्रक चे काप करून टाकायचे हे थोडा वेळ परतून घ्यायचे.
स्टेप ६)- आणि नंतर त्यामध्ये कांदा कापून टाकायचा कांदा थोडावेळ परतून झाल्यानंतर त्यामध्ये टमाटर टाकायचा आणि थोडासा हलवून घ्यायचे आहे.
स्टेप ७)- लसूण हिरवी मिरची अद्रक कांदा टमाटर हे सर्व परतून झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची.
स्टेप ८)- आता कढईमध्ये तीन ते चार टेबलस्पून तेल टाकायचं तेल गरम होईपर्यंत एका प्लेटमध्ये आपण मसाले काढून घेऊ त्यामध्ये हळद तिखट गरम मसाला आणि मीठ हे काढून ठेवू.
स्टेप ९)- तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये प्लेटमध्ये काढलेली मसाले आधी टाकून घेऊ थोडासा परतून झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट त्यामध्ये टाकून छान परतून घ्यायचे आहे.
स्टेप १०)- मसाले छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये उकडलेले मटर टाकायचे नंतर त्यामध्ये पालकची पेस्ट टाकून घ्यायची आणि नंतर छान परतून घ्यायचे आणि त्यामध्ये पनीरचे तुकडे टाकायचे यावेळी थोडीशी कस्तुरी मेथी हातावर चुरगळून टाकायचे.
स्टेप ११)- आणि नंतर पाच मिनिटे तसंच शिजू द्यायचं Matar Palak Paneer शिजून झाल्यानंतर त्याला एका बाऊलमध्ये काढून सर्व्ह करायची ती आपण चपाती सोबत भाकरी सोबत खाऊ शकतो आणि भातासोबत पण खाऊ शकतो Matar Palak Paneer खूप छान वाटते आणि लहान मुलांना तर ती खूप आवडते.