चना डाळ कांदा रेसिपीस (Chana Dal kanda Recipe In Marathi)

जेव्हा घरामध्ये भाजीपाला नसतो तेव्हा गृहिणींना प्रश्न पडतो की आता काय बनवायचं.  घरात खूप सारे वस्तू असतात तरीसुद्धा काय बनवायचं काय बनवायचं असं विचार येतो. तर म्हणून काहीतरी वेगळं म्हणून आज आपण डाळ कांदा करूयात चण्याच्या डाळीचा डाळ कांदा खायला खूप रुचकर असते. पोळी सोबत भातासोबत आणि काहीतरी वेगळं म्हणून पण खूप छान वाटतो. विशेषता चणा डाळीचा डाळ कांदा उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यात गृहिणी बनवतात. गृहिणींना तर नेहमीच वेगवेगळ्या काहीतरी बनवण्याची सवय असते त्या किचन मधील अनेक वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत असतात. तर अशाच गृहिणींसाठी आज आपण बनवणार आहोत चण्याच्या डाळीपासून डाळ कांद्याची रेसिपी

 

साहित्य:-

1)- एक वाटी चणाडाळ

2)- पाच ते सहा कांदे

3)- दोन हिरवी मिरची

4)- दोन टमाटर

5)- आलं लसूण पेस्ट

6- धना पावडर

7)- हिंग

8) कढीपत्ता

9)- कोथिंबीर

10)- हळद पावडर

11)- लाल तिखट

12)- चवीनुसार मीठ

13)- मोहरी

 

                     डाळ कांदा बनवण्याची पद्धती 

कृती :-

 

       डाळ कांदा बनवण्यासाठी सर्वात आधी चणाडाळ स्वच्छ पाण्याने धुऊन ते एक ते दोन तास भिजू घालत ठेवून द्यायचा. चणाडाळ भिजली की त्यानंतर आपण भाजी करायला घेऊ त्यासाठी आधी आपण चार ते पाच कांदे कापून घ्यायचे दोन हिरवी मिरची कापून घ्यायची आणि दोन टमाटर  कापून घ्यायचे. नंतर चार ते पाच लसूण पाकळ्या सोलून आणि दोन-तीन आल्याचे तुकडे घेऊन आले लसणाची पेस्ट तयार करून घ्यायची.

 

        आता आपण भाजी फोडणी देण्यासाठी गॅस वरती कढई ठेवू. कढईमध्ये तीन टेबलस्पून तेल टाकायचा तेल गरम झाला की त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची मोहरी तडतडायला लागली की त्यामध्ये हिंग कढीपत्ता आले लसणाची पेस्ट टाकायची हे परतून झालं की त्यामध्ये कांदा मिरची टाकायची  कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा.

 

        कांदा छान लालसर झाला की त्यामध्ये बारीक चिरलेला टमाटर टाकायचा टमाटर थोडासा परतून घ्यायचा. नंतर त्यामध्ये हळद पावडर अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आणि धना पावडर टाकायचा आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा फोडणीला तेल सुटायला लागला की मग त्यामध्ये भिजलेली चणाडाळ टाकायची.

 

        साईडच्या गॅस वरती थोडा पाणी गरम करायला ठेवायचे  आणि आपल्याला फोडणीमध्ये जेवढा पाणी लागते तेवढा गरम पाणी टाकायचे  म्हणजे चणाडाळ शिजायला थोडी मदत होते.

पंधरा मिनिट तरी भाजी शिजू द्यायची नंतर छान शिजून झाल्यानंतर त्यावर ती कोथिंबीर टाकायची झाली आपली चना डाळीचा दाळ  कांदा तयार.

 

टीप:- 

      आपण जर का चणाडाळ भिजवण्याचे विसरून गेलो असेल आणि आपल्याला लवकर चना डाळ भिजवायची असेल तर पाणी थोडा कोमट करून घ्यायचं आणि त्यामध्ये चणाडाळ टाकायची म्हणजे एका तासांमध्ये पण चणाडाळ लवकर भिजून तयार होते.

 

Leave a comment