करटुलेची (काटोल/ काटवलं ) भाजी ( Kartule Recipe In Marathi)

 करटुलेची (काटोल/ काटवलं ) भाजी

( Kartule Recipe In Marathi)

        आपण आज करटुले भाजी ( Kartule Recipe In Marathi) कशी तयार कराची ते बघणार आहोत. करटुले भाजीला काटवल / काटोल सुद्धा म्हटले जाते. ही एक पावसाळी रानभाजी आहे. ही रानभाजी पावसाळ्यामध्येच मिळते.  यामध्ये खूप औषधी गुणधर्म असतात. फायबर अँटीऑक्सिडंट असते आणि पचायला खूप हलकी असते, यामुळे बद्धकोष्ठता बारा होतो व शरीरातील  घातक घटक बाहेर टाकल्या जाते.  कॅन्सर हृदयविकारासाठी सुद्धा हि रानभाजी खूप उपयुक्त आहे.  या भाजी मुळे पोटावरील चरबी कमी करण्यासाठी खूप मदत होते.  मधुमेहासाठी सुद्धा ही रानभाजी खूप फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण कमी व्हायला मदत होते. १०० ग्रॅम करटुल्यामध्ये १७ कॅलरीज असतात. 

      करटुले बाजारपेठेमध्ये पावसाळा सीझनमध्ये खूप महाग असतात पण ते फळ वर्षातून एकदाच येत असल्यामुळे ग्राहकांची याला खूप पसंती असते. पावसाळ्यामध्ये या भाजीला खूप खाल्ल्या जाते. नुसतीच काटवलची भाजी बनवतात किंवा त्यामध्ये डाळ टाकून पण बनवली जाते.  चना दाळ टाकून बनवल्यामुळे ती भाजी खूप छान चिविष्ठ बनते. आज आपण चणाडाळ टाकून करटुल्याची भाजी बनवणार आहोत. करटुले ( Kartule Recipe In Marathi) ची भाजी तयार करण्यासाठी  लागणारे साहित्य बघू या. 

साहित्य:-

 

1)- एक पाव करटुले

2)- एक मोठा कांदा 

3)- चार ते पाच लाल मिरची

4) पाच ते सहा लसूण पाकळ्या

5)- मोहरी

6)- जीरा

7)- दोन हिरवी मिरची

8)- एक टमाटर

9)- हळद पावडर

10)- चवीनुसार मीठ

11)- थोडीशी चणाडाळ

 

करटुले बनवण्याची पद्धती ( Kartule Recipe In Marathi)

 

कृती:- सर्वात आधी थोडीशी चणाडाळ भिजवायला ठेवून द्यायचे.  चणाडाळ भिजली की करटुल्याची भाजी तयार करण्यासाठी घ्यायच. करटुले बनवण्यासाठी एक पाव करटुले स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे. आणि नंतर त्यांना गोल गोल कापून घ्यायचे. एक कांदा कापून घ्यायचा दोन हिरवी मिरची एक टमाटर पाच ते सहा लसूण पाकळ्या सोलून त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि लाल मिरचीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. 

 

          नंतर भाजी फोडणी देण्यासाठी गॅस वरती एक कढई ठेवायची त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल टाकायचा. तेल गरम झाला की त्यामध्ये मोहरी आणि जिरा टाकायचा मोहरी जीरा तडतडायला लागले की त्यामध्ये लसूण पाकळ्या टाकायच्या. लसूण पाकळ्या चा रंग लालसर व्हायला लागला की त्यामध्ये कांदा हिरवी मिरची आणि लाल मिरची टाकायची आणि त्यांना लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा.

           कांद्याला लालसर रंग आला की त्यामध्ये टमाटर टाकायचा टमाटर थोडा वेळ शिजल्यानंतर त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून छान परतून घ्यायचा. कांदा टमाटर व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये करटुले आणि चणाडाळ टाकायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आणि कडे वरती झाकण ठेवून त्याला मंद आचेवरती शिजू द्यायचा. करटुले आणि चणाडाळ शिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे एवढा वेळ लागणार दहा ते पंधरा मिनिटे झाले की करटुले आणि चणाडाळ व्यवस्थित शिजवून तयार होईल.

Leave a comment