सांबर वडा रेसिपी (Sambhar Vada Recipe in Marathi)

सांबर वडा रेसिपी (Sambhar Vada Recipe in Marathi)

 

सांबर वडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य :- 

 

१) एक वाटी उडद डाळ 

२) थोडासा जीरा

३) दोन लसूण पाकळ्या

४) मीठ

५) तळण्यासाठी तेल

६) एक वाटी तूर डाळ

७) एक टोमॅटो

८) एक कांदा

९) आलं लसूण पेस्ट

१०) हिंग

११) कोथिंबीर

१२) कढीपत्ता

१३) दोन लाल मिरची

१४) हळद पावडर

१५) तिखट

१६) तेल

१७) चिंच

 

आता आपण चटणी साठी लागणारे साहित्य पाहूया :-

 

१) अर्धा पाव शेंगदाणे

२) खोबऱ्याचा तुकडा

३) कढीपत्ता

४) कोथिंबीर

५) चवीनुसार मीठ

६) दही

७) तडक्यासाठी मोहरी

८) दोन लसूण पाकळ्य

९) तडक्यासाठी तेल

 

स्टेप १ :- सांबार वडा रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला दोन व्यक्तींसाठी एक वाटी उडदाची डाळ रात्री भिजवून ठेवावी आणि सकाळी ती मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी. 

 

स्टेप २ :- मिक्सरमध्ये बारीक करताना त्यामध्ये दोन लसूण पाकळ्या थोडासा जिरा टाकावा आणि बारीक केल्यानंतर त्यामध्ये थोडासा मीठ घालून छान फेटून घ्यावा.

 

स्टेप ३ :- फेटून झाल्यानंतर हाताला थोडं थोडं पाणी लावून हातावर ते सारण घ्यावा आणि दोन्ही हातावर इकडे तिकडे पलटवून मधामध्ये छिद्र करून गरम झालेल्या तेलामध्ये टाका म्हणजे आपले गोल वडे तयार होतील. लालसर रंग येईपर्यंत त्याला तळून घ्यावे   सदर सारना मध्ये खाण्याचा सोडा टाकायची गरज नाही सारणास  छान फेटल म्हणजे वडे आपोआप खूप छान फुगतात आणि चवीला पण खूप छान लागतात.

 

            आता आपण सांभार कसा बनवायचा ते बघूया 

 

स्टेप १ :- सांबार बनविण्यासाठी  एक वाटी डाळ कुकरमध्ये टाकूया नंतर त्यामध्ये टोमॅटो, हळद, तेल, हिरवी मिरची टाकून कुकर लावून घेऊ कुकर होईपर्यंत चिंचा भिजवून घेऊया. 

स्टेप २ :- कुकरमध्ये डाळ चांगल्या प्रकारे शिजल्यानंतर आता आपण सांबारला तयार करण्यासाठी फोडणी देऊया. फोडणी देण्यासाठी एक कांदा दोन लाल मिरची, हिंग लाल तिखट हळद मीठ सर्वप्रथम आपण एका पातेल्यामध्ये  तेल टाकूया नंतर त्यामध्ये मोहरी, जीरा टाकून तडतडल्यानंतर हिंग कढीपत्ता, लाल मिरची आणि कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊया. 

 

स्टेप ३ :- सदर सांभाराच्या फोडणी मध्ये  आले लसूण पेस्ट टाकल्या नंतर त्यामध्ये तिखट हळद मीठ घालून छान परतून घेऊया आता शिजलेली डाळ त्यामध्ये घालूया आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून भिजवलेली चिंच त्याचा रस काढून सांभार मध्ये टाकून घेऊ आणि छान एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आता सांभार तयार झालेला आहे. 

 

आता चटणी कशी बनवायची ती बघूया. 

 

स्टेप १ :- चटणी बनविन्यासाठी आधी शेंगदाणे तव्यावर भाजून घ्यायचे आहे. नंतर त्याचा साल काढून घेऊन मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे आणि खोबरे  त्यामध्ये  दोन लसूण पाकळ्या जिरं कोथिंबीर कढीपत्ता दोन हिरव्या मिरच्या थोडस मीठ घालून बारीक करून घेऊया. 

स्टेप २ :- मिक्सर मध्ये सारण बारीक केल्यानंतर त्याला तडका मारण्यासाठी एका छोट्या भांड्यात तेल गरम करून घेऊया  आणि त्यामध्ये मोहरी टाकून तडतडू द्यायची ती मोहरीची फोडणी शेंगदाण्याच्या मिक्सरमध्ये बारीक केलेल्या वाटणामध्ये घालायची झाली चटणी तयार. चटणी मध्ये आपण थोडे दही सुद्धा घालू शकतो.

Leave a comment