फुलबाग कशी तयार करायचे |How to make flower garden at home in Marathi

फुलबाग कशी तयार करायचे |How to make flower garden at home in Marathi

 

            घरामध्ये फुलबाग असेल तर आपले मन प्रसन्न राहते. आणि फुले आपल्या डोळ्यांना दिसेल तेव्हा आपण आनंदित होऊन जातो. फुले बागेत असतील तर आपले घर सुद्धा सुंदर दिसते.  जेव्हा कधी आपला वेळ जात नसेल तेव्हा आपण जर आपल्या फुल बागेत बसलो तर आपले मन प्रसन्न होऊन आपला वेळ सुद्धा छान जाईल. म्हणून आपण सगळे घरी छोटीशी जागा असेल तरी सुधा थोडी तरी फुले झाडे लावत असतो. आणि म्हणून फुलबाग कशी तयार करायची हे आपण पाहूया.

 

सगळ्यांच्याच घरी छोटीशी का होईना जागा असतेच आणि फुलझाडे लावायला सगळ्यांनाच आवडत असते फुलबाग लावण्यासाठी घरी किती जागा उपलब्ध आहे त्याच्यानुसार आपण झाडे लावण्यासाठी घरी विटांचे गोल सरी तयार करून त्यामध्ये काळी माती वापरायची आणि मधामाधात सुंदरश्या कुंड्या लावल्यात तर   फुलबागेमध्ये खूप छान दिसते आणि आपण घरच्या वस्तूचा वापर केला तर वस्तूही कामी येईल त्यासाठी प्लास्टिक बॉटल तेलाचे कॅन यांना जर का रंग करून त्यावर सजावट केली . तर ते सुद्धा आपण वापरू शकतो आणि त्यामध्ये फुलांची वेली लावली तर फुलबाग खूप सुंदर दिसते.

 

फुलबाग तयार करण्यासाठी आवश्यक उपकरण आणी माती.

घरची माती जर काळी किंवा पाणी निचरा होणारी तसेच पाणी धरून ठेवणारी असेल तर चांगलीच  जर नसेल तर  बाहेरून माती बोलवावी जर माती बोलवीने शक्य नसेल तर घरातील माती मध्ये शेनखत किंवा बाजारातमिळणरे गांढुळ खत आणून त्यामध्ये मिळवावे सदर माती भुसभूसीत करुन कुंडयामध्ये भरावी किंवा विटा लावून सरी तयार केलेले असल्यास त्यामध्ये भुसभूसीत करुन भरुन त्यामध्ये पाणी ठाकून  ओली करावी. त्यामुळे माती मधील उष्णता निघून जाईल. व माती फुलेझाडे लावण्यास योग्य होईल. सदर माती भुसभूसीत करण्यासाठी 1)खुरपणी 2) पावडा 3) पाणी देण्यासाठी पाईप 4) टोपली 5) कैची इत्यादी लागणारे ‍अवजार साहीत्य हे एकतर बाजारात उपलब्ध आहे किंवा तुम्ही ऑनलाईन साईड वरुन सुध्दा विकत घेवू शकता.

 

आपल्या फुल बागेची देखभाल कशी करावी.

      आपण आपल्या घरी जी फुलझाडे लावली आहेत. त्या झांडाची नेहमी काळजी घेणे आवश्यक आहे. फुलझांडाना वेळोवेळी पाणी आणी खते देणे आवश्यक आहे. पाणी हे नेहमीच संध्याकाळी दयावे त्यामुळे पाणी रात्रभरामध्ये मातीमध्ये खोलवर जावून मुळाला मिळेल व पाण्याचे भाष्पीभवन सुधा कमी होईल.  मुळे पाणी पुर्ण शोसून घेवून सकाळी फुलझाडे सुंदर व ठवठवीत दिसतात. फुलझडांना खत देतांना शेनखत किंवा गांढूळ खताचाच वापर करावा रासायनीक खतांचा वापर करणे टाळावे कारण रासाईनीक खतामुळे काही काळा नंतर जमीन खारी किंवा खराब होण्याची शकयता असते शेनखत किंवा गांढूळ खतामुळे जमीन नॅचरली चांगली तिची सुपीकता ठिकून राहील. खत ही वर्षातून एक किंवा दोन वेळा दिले तरी चालेल. फुलझाडांच्या आवश्यकते नुसार छाटणी करावी.  

Leave a comment