वांग्याचे भरीत रेसिपी (Wangache Bharit Racipe in Marathi )

वांग्याचे भरीत रेसिपी (Wangache Bharit Racipe in Marathi )

              वांग्याचे भरीत सर्वांनाच खूप आवडते तसं तर वांगे नेहमीच मिळतात पण हिवाळ्यामध्ये खूप छान मोठे वांगे मिळतात त्याचं भरीत खायला एकदम अप्रतिम वाटतं वांग्याचे भरीत बनवणे खूप काही अवघड गोष्ट नाही खूप सहजपणे आपण वांग्याचे भरीत बनवू शकतो वांग्याच भरीत बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे वांग्याला भाजल्या सारख्या पद्धतीने जाते पण नंतर  त्याची प्रोसेस वेगवेगळी केली जाते. कोणी फोडणी देतात तर कोणी तडका मारतात कोणी भाजी सारखं बनवतात तर यातलाच एक प्रकार आपण बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आज आपण वांग्याचे भरीत बनवणार आहोत.

वांग्याचे भरीत बनवण्यासाठी लागणारे साहित्य

साहित्य:-
1)- मोठे वांगे तीन ते चार 
2)- दोन ते तीन टमाटर
3)- सात ते आठ हिरवी मिरची
4)- पाच सहा लसूण पाकळ्या
5)- फोडणीसाठी मोहरी
6)- कढीपत्ता
7)- चवीनुसार मीठ
8)- हिंग
9)- कोथिंबीर
10)- तेल
आता आपण वांग्याचे भरीत कसं तयार करायचं ते बघून घेऊयात.
स्टेप 1)- वांग्याचे भरीत तयार करण्यासाठी सर्वात आधी सर्व वांगे टमाटर मिरची स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची.
स्टेप 2)- धुऊन घेतल्यानंतर वांग्याला, टमाटर ला आणि मिरचीला तेल लावून घ्यायच वांग्याच्या मध्ये थोडा थोडा काप करून त्यामध्ये लसूण पाकळ्या टाकायच्या.
स्टेप 3)- आता गॅस चालू करून गॅस वरती एक जाळी ठेवायची आणि त्यावरती वांगे टमाटर आणि मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची. भाजून घेते वेळी ते आलटून पालटून फिरवत राहायची आणि त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे.

स्टेप 4)- वांगे टमाटर मिरची पूर्णपणे भाजून झाल्यानंतर त्याला थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर वांग्याची साल काढून घ्यायची.
स्टेप 5)- एका भांड्यामध्ये वांग्याचे साल काढून वांगे आणि त्यामधील लसूण भाजलेले टमाटर कापून घ्यायचे. मिरची कापून घ्यायची. सर्व मिश्रण एकजीव करायचं नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ कोथिंबीर टाकायचे आणि फिरवून घ्यायच.

स्टेप 6)- नंतर गॅस वरती एक छोटीशी कढई ठेवून किंवा तडका पॅन ठेवून त्यामध्ये थोडासा तेल टाकायचा तेल व्यवस्थित गरम झाला की त्यामध्ये मोहरी  टाकायची मोहरी  तडतडायला लागली की नंतर त्यामध्ये थोडासा हिंग आणि कढीपत्त्याची पाने टाकायची आणि कडक झालेला तेल भरताच्या मिश्रणावरती टाकायचं आणि सर्व मिश्रण व्यवस्थित फिरवून घ्यायचा.
या भरतामध्ये आपण हिवाळ्यामध्ये जेव्हा हिरवे वाटाणे कांद्याचा पाला निघतो , हिरवे वाटाणे आणि कांद्याच्या पाला कापून टाकला तर आणखी भरीत खायला खूप टेस्टी वाटतो.

Leave a comment