Skip to content
व्हेज बिर्याणी रेसिपी
(veg biryani recipe in Marathi)

आपण आज बनवणार आहोत व्हेज बिर्याणी रेसिपी व्हेज बिर्याणी खायला खूप अप्रतिम लागते. आपण रोज घरी भाजी पोळी वरण भात खातच असतो. कधी कधी आपण मसालेभात सुद्धा बनवतो तर मग त्यापेक्षा कधी वेगळा ही खावशी इच्छा होते. त्यासाठीच आज आपण वेगळ्या प्रकारे व्हेज बिर्याणी रेसिपी तयार करणार आहोत. व्हेज बिर्याणी सगळ्यांनाच आवडणार आहे कधी आपण चिकन बिर्याणी खातो कधी अंडा बिर्याणी खातो तर आज आपण वेज बिर्याणी सुद्धा खाऊन बघूया.
व्हेज बिर्याणी मध्ये सर्व प्रकारचे व्हेजिटेबल असल्यामुळे हे खूप पौष्टिक सुद्धा बनते आणि लहान मुल आवडीने खातील आणि त्यांना सर्व प्रकारच्या भाज्या सुद्धा आवडतील आणि त्यांचे पोटभर जेवण सुद्धा होईल. लहान मुलाच काय तर मोठे व्यक्ती सुद्धा व्हेज बिर्याणी खाऊन पोटभर जेवण करतील व्हेज बिर्याणी मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरल्या जातात. त्यामुळेच तर व्हेज बिर्याणीची चव आणि रंगत आणि त्याची पौष्टिकता वाढत जाते. व्हेज बिर्याणी एकदा बनवली की मुलं ती नेहमी बनवून मागतात. आणि मुलं पोटभर जेवण सुद्धा करतात चला तर अशाच प्रकारे काहीतरी वेगळे प्रकारचं म्हणून आज आपण व्हेज बिर्याणी रेसिपी कशी बनवणार आहोत ते बघूया.
व्हेज बिर्याणी साठी लागणारे साहित्य
साहित्य:-
1) अर्धा किलो बासमती तांदूळ
2) अर्धा पाव फुलकोबी
3) अर्धा पाव बीन्स
4) दोन आलू
5) अर्धा पाव गाजर
6) अर्धी वाटी हिरवे वाटाणे
7) बिर्याणी मसाला
8) लाल तिखट एक चमचे
9) अर्धा चमचा हळद
10) चवीनुसार मीठ
11) अद्रक लसूण आणि मिरचीचा पेस्ट एक चमचा
12) दही अर्धी वाटी
13) चार कांदे
14) एक टमाटर
15) दोन हिरव्या मिरची
16) कोथिंबीर
17) पुदिन्याची पाने असली तर
18) केशर दूध
19) खडे मसाले म्हणजेच तेजपत्ता, कलमी कर्णफुल, लवंग, विलायची, मोठी विलायचील काळी मिरी
20) लिंबू
21) अर्धा पाव पनीर
22) एक ते दोन चमचे तूप
व्हेज बिर्याणी बनवण्याची पद्धत
कृती:-
स्टेप- 1) व्हेज बिर्याणी बनवायला सुरुवात करायच्या सर्वात आधी बासमती तांदूळ स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुऊन घेऊन त्याला भिजत ठेवायच. आणि नंतर सर्वात आधी तीन ते चार कांदे कापून घ्यायचे लंबे लंबे काप करायचे आणि त्याला तळून घ्यायचं तळून झाल्यानंतर त्याला वेगळ्या प्लेटमध्ये काढून ठेवायचं. थोडासा दूध गरम करून घ्यायचा आणि अर्धा वाटी मध्ये काढून ठेवायचा त्यामध्ये केसर टाकून बाजूला ठेवून द्यायचा.
स्टेप-2) नंतर सर्व भाज्या कापून घ्यायच्या. म्हणजेच फुलकोबी, हिरवा वाटाणा, गाजर, बीन्स, आलू हे सर्व साहित्य कापून एका बाऊलमध्ये टाकायचे. बाऊलमध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी दही टाकायचा. दही टाकून झाला की त्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ, बिर्याणी मसाला, आलं लसुन मिरचीची पेस्ट, एक दोन हिरवी मिरचीचे काप करून, थोडेसे तळलेले कांदे,थोडीशी कोथिंबीर,असतील तर पदीण्याची पाने, हे सर्व साहित्य टाकल्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायचा.
स्टेप-3) आता एका गंजामध्ये अर्धा गंज पाणी गॅस वरती गरम करायला ठेवायचं पाणी गरम झाला की त्यामध्ये दोन ते तीन लवंग, दोन विलायची,एक भेंडी विलायची ,पाच ते सहा काळीमिरी, एक कर्ण फुल, तेज पत्ता,कलमी आणि अर्धा लिंबू कापून टाकायचा हा पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये बासमती तांदूळ टाकायचे आणि अर्ध शिजेपर्यंत पकवून घ्यायचा.
स्टेप-4) आता एका जाडसर गंजामध्ये दोन चमचे तेल टाकायचा आणि पनीरचे काप करून पनीर तळून घ्यायचा पनीर थोडासा गोल्डन ब्राऊन व्हायला लागला की तो एका प्लेटमध्ये काढून ठेवायचा. आणि आता त्या तेलामध्ये सर्व भाज्यांचे मिश्रण करून ठेवला आहे तो टाकायचा आणि त्यामध्ये थोडासा पाणी टाकायचा आणि त्याला एक वाफ येऊ द्यायची. वाफ आल्यानंतर झाकण खोलून त्यामध्ये पनीरचे फ्राय केलेले काप टाकायचे आणि फिरवून घ्यायचं.
स्टेप-5) आता परतून घेतलेल्या मिश्रणावर टोमॅटोचे चार काप करून घ्यायचे आणि गोल गोल ठेवायचे आणि नंतर त्यावरती फ्राय केलेले थोडेसे कांदे पसरवायचे आणि कोथिंबीर पसरवून घ्यायची नंतर त्यावरती अर्ध पकलेले बासमती चावल पसरवून घ्यायचं जेवढे बासमती चा आपण भात शिजवून घेतलेला आहे तेवढाही त्यावरती टाकायचा आणि पूर्ण टाकून झाल्यानंतर त्यावरती एक चमचा तूप गोल गोल टाकायचा, नंतर त्यावरती तळून घेतलेले कांदे पसरवून घ्यायचे कांदे पसरवून झाल्यानंतर कोथिंबीर टाकायची पुदिन्याची पाने टाकायची आणि नंतर त्यावरती केशर दूध टाकायचा केशर दूध टाकल्यानंतर त्याच्या मधून वाफ निघणार नाही असं पक्क झाकण झाकून घ्यायचा आणि त्याला कमी गॅस करून बिर्याणी वाफवून घ्यायची.