Skip to content
तिळगुळ लाडू रेसिपी
(Tilgul recipe in Marathi)
तिळगुळ हा शरीरासाठी गरम असतो आणि म्हणूनच तीळ भरपूर प्रमाणात हिवाळ्यामध्ये खाल्ले जातात हिवाळ्यामध्ये म्हणूनच आपण तिळगुळाचे लाडू बनवत असतो खास म्हणजे आपण हे लाडू संक्रांति निमित्त बनवत असतो. संक्रांतीला तर प्रत्येकाच्या घरी तिळगुळाचे लाडू बनवल्या जाते आणि याच निमित्ताने आपल्याला पौष्टिक असा लाडू खायला मिळतो. तिळगुळाचे लाडू खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात गर्मी पैदा होऊन आपल्याला सर्दी खोकला कमी होतो. आणि लहान मुलांना तर हा लाडू आपल्याला द्यायलाच लागत नाही ते स्वतःहूनच रोज लाडू खातात. कारण त्यांना हा लाडू खूपच आवडतो लहान मुलांनाच काय तर मोठ्यांना सुद्धा तिळगुळाचे लाडू खूप आवडतो तिळगुळाचे लाडू खूप पौष्टिक सुद्धा आहे आणि खायला सुद्धा खूप टेस्टी वाटतो चला तर आपण आता बघूया तिळगुळ लाडू कस बनवतात.
तिळगुळ लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य
साहित्य:-
1)- अर्धा किलो तीळ
2)- अर्धा पाव शेंगदाणे
3)- अर्धी वाटी खोबरा कीस
4)- एक पाव गुड
5)- चार-पाच विलायची
कृती:-
1)- सर्वात आधी तीळ स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे. नंतर त्यांना सुती कापडावरती पसरवून वाळवून घ्यायचे.
2)- तीळ वाढल्यानंतर त्यांना व्यवस्थित तीळ-तडतडेपर्यंत भाजून घ्यायचं. तीळ भाजून झाल्यानंतर ते एका भांड्यामध्ये काढून ठेवायचं तीळ थोडे थंड झाले की मग त्यांना मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं.
3)- तीळ मिक्सरमध्ये फिरवून झाल्यानंतर बारीक झालेले तीळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे नंतर शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आणि ते सुद्धा मिक्सरला फिरवून घ्यायचं.
4)- शेंगदाणे आणि तीळ एकाच भांड्यामध्ये काढून घ्यायचे नंतर त्यामध्ये खोबरा कीस टाकायचा जेव्हा आपण तीळ भाजतो त्यामध्येच विलायची सोलून टाकायची म्हणजे तिळाबरोबरच विलायची सुद्धा बारीक होऊन जाते.
5)- आता सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये गूळ टाकायचा गुळ नरम असेल तर हातानेच फोडून मिक्स करायचं किंवा गुड फोडता येत नसेल तर त्याला किसणीने किसून टाकायचा म्हणजे मिक्स करायला सोपं जाते.
6)- सर्व साहित्य तीळ शेंगदाणे खोबरा कीस आणि गुड सर्व मिळून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं गुडाला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं की त्यामध्ये तो मिक्स झाला पाहिजे सर्व मिश्रण मिक्स झाला की त्याचे सारख्या आकाराचे लाडू तयार करून घ्यायचे तिळगुळाचे लाडू किती दिवस टिकतात अशा प्रकारे तिळगुळाचे लाडू तयार होते.