रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)

रवा बेसन लाडू

(rava besan laddu recipe in marathi)

 

आज आपण बनवणार आहोत रवा बेसन लाडू रवा आणि बेसन मिक्स करून बनवल्याने यापासून बनवलेले लाडू खायला खूप चविष्ट लागतात. रवा बेसन लाडू लहान मुलांनाच  काय तर मोठ्यांना सुद्धा गोड खावसं वाटतं. कधी तोंडाला एक वेगळी चव म्हणून आपल्याला कधी कधी आवड निर्माण होते. एखाद्या वेळी गोड खाण्याची खूप इच्छा निर्माण होते त्यातच लाडूच नाव घेतलं की ती लहान मुलांना तर काय मोठ्यांना सुद्धा खूप आवडते. मग ते लाडू कोणतेही असो बुंदी असो वा बेसन यातलाच एक प्रकार आपण आज बनवणार आहोत. रवा बेसन लाडू आज आपण तयार करणार आहोत त्याचे योग्य प्रमाणात पाक तयार करणे गरजेचे पाक जर व्यवस्थित झाला नाही तर लाडू कडक होतात किंवा तुटून जातात तर आज आपण योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने रवा बेसन लाडू कसे बनवायचे आहेत ते बघूया. रवा बेसनाचा योग्य माप घेणार आहोत यामुळे लाडू ची टेस्ट खूप अप्रतिम वाटते. लाडू तोंडात टाकल्यावर विरघळून जातो मन अगदी प्रसन्न होते. चला तर मग आपण रवा बेसनापासून लाडू तयार करणार आहोत.

रवा बेसन लाडू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

साहित्य:-

  • 1)- दोन वाटी रवा

  • 2)-एक वाटी बेसन

  • 3)-तीन वाटी साखर

  • 4)-अर्धी वाटी तूप

  • 5)-1/2 टीस्पून वेलची पूड

      6)- काजू आणि बदामाचे तुकडे 

  • 7)-जायफळ आवडीप्रमाणे

रवा बेसन लाडू तयार करण्याची कृती 

कृती:-

1)- सर्वात आधी लाडू तयार करण्यासाठी सर्व साहित्य भाजून घ्यावे लागतात त्यासाठी आपण सर्वात आधी दोन वाटी रवा भाजून घेणार आहोत त्यासाठी गॅस वरती एक कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचं आणि रवा व्यवस्थित चाळून घ्यायचा रवा चाळून  झाल्यानंतर तो कढईमध्ये टाकायचा आणि व्यवस्थित त्याचा खमंग सुवास सुटेपर्यंत आणि थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. 

2)-आता रवा भाजून झाल्यानंतर तो एका ताटामध्ये काढून ठेवून द्यायचा आणि आता दोन चमचे तूप टाकून त्यामध्ये बेसन चाळून टाकायचं आणि त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं बेसन भाजत असताना त्याला थोडा थोडा तूप टाकत राहायचं आणि बेसन पातळ झाल्यानंतर त्याच्या रंग बदलेपर्यंत सुवास सुटेपर्यंत त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं बेसनाला भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. बेसन  व्यवस्थित भाजून झालं की रव्या वरती म्हणजेच आपण ज्या ताटामध्ये रवा ठेवलेला आहे त्याच  ताटामध्ये बेसन काढून ठेवायचं. 

3)-बेसन काढून ठेवल्यानंतर आता आपण पाक तयार करायला घेऊ  त्यासाठी एका स्टीलच्या गंजा मध्ये तीन वाटी साखर आणि तीन वाटी पाणी  टाकायच आणि त्याला एक तारी पाक येईपर्यंत ढवळत राहायचं. पाक होत असताना घाई करायची नाही त्याला बोटावर घेऊन बघायचं  म्हणजे दोन बोटावरती चिपकवून बघायचं दोन बोटाच्या मधा मधून एक तार तुटायला पाहिजे म्हणजेच समजून जायचं की पाक व्यवस्थित झाले आहे. पाक व्यवस्थित एकतारी  झालं की त्यामध्ये वेलची पूड टाकायचे आणि थोडीशी जायफळ किसून टाकायचे. काजू आणि बदामाचे तुकडे टाकायचे नाही ते नंतर टाकायचे. 

4)-आता हा पाक व्यवस्थित तयार झाल्यानंतर रवा बेसनच्या ताटामध्ये टाकायचा आणि सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचा तो मिश्रण थोडा घट्टसर येईपर्यंत त्याला फिरवत राहायचं आपल्याला आधी खूप पातळ वाटेल पण तो हळूहळू घट्टसर येत जातो त्याला फिरवतच राहायचं  काही वेळानंतर तो सेट व्हायला लागतो  थोडा घट्टसर यायला लागल्यानंतर त्याला खूप थंड सुद्धा होऊ द्यायचा नाही. 

5)- नंतर त्यामध्ये काजू बदामाचे तुकडे घालायचे आणि हातामध्ये लाडू जमत आहे का ते बघायचे नाही तर त्याला पुन्हा फिरवत राहायच आणि नंतर एक चमचा घ्यायचा आणि त्याच्यानेच एकसारखे लाडू च सारण हातामध्ये पकडून व्यवस्थित लाडू तयार करून घ्यायचे अशाप्रकारे मऊसूद अशी रवा बेसनाचे लाडू तयार होतात.

Leave a comment