ड्रायफ्रूट्स लाडू रेसिपी ( Dry Fruits laddu recipe in Marathi )

                                 

 ड्रायफ्रूट्स लाडू रेसिप ( Dry Fruits laddu recipe in Marathi )

          हिवाळा ऋतू सुरु झालेला असुन लहान मुलांसाठी, मोठ्या व्यक्तींसाठी, वृद्ध लोकांसाठी हिवाळ्यामध्ये ड्रायफ्रूट्स खाणं खूप चांगला असते. हिवाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवल्या जातात त्यामध्ये आज आपण ड्रायफ्रूट्स पासून लाडू बनवणार आहोत.  त्यामध्ये आपण साखर  वापरणार नाही आहोत. नॅचरल पद्धतीने आपण आज लाडू बनवणार आहोत.   ड्रायफ्रूट्स चे लाडू लहान मुले आवडीने खातील हे लाडू हिवाळ्यामध्ये खाल्ल्यामुळे मुलांची, वृद्धांची हाडे मजबूत होतात आणि त्यांची बुद्धीची क्षमता वाढते तसेच आपल्या शरीरात गर्मी टिकून राहते. हिवाळ्यामध्ये लहान मुले खूप आजारी पडतात त्यांना सर्दी, खोकला ताप येतच राहतो त्यामुळे ते कमजोर बनतात.  त्यांच्यासाठी हे लाडू खूप महत्त्वाचे आहेत त्यांनी रोज एक Dry Fruits laddu खाल्ला तरी त्यांच्या शरीराची झीज भरून निघण्यासाठी खूप फायद्याचे आहे. 

       तसेच महिलांच्या आरोग्यासाठी ड्रायफ्रूट्स लाडू (Dry Fruits laddu) खूप फायद्याचे आहे.  हिवाळ्यामध्ये महिलांचे मोठ्या प्रमाणात केस गळती चालू होते केस गळतीचे प्रमाण जास्त हिवाळ्यामध्येच राहते रोज थोडे थोडे खूप केस जातात त्यामुळे महिलांसाठी सुद्धा हे लाडू खूप फायद्याचे आहे. त्यांनी सुद्धा रोज एक लाडू खाल्ल्यामुळे त्यांच्या केसांसाठी शरीरासाठी खूप फायद्याचे ठरते चला तर आपण आता हे ड्रायफ्रूट्स चे लाडू कसे बनवायचे ते बघूया.

ड्रायफ्रूट्स लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-

साहित्य :- 

                1) 200 ग्रॅम खजूर

              2) पाऊण वाटी बदाम

              3) पाऊण वाटी अक्रोड

              4) पाऊण वाटी काजू

              5) पाऊण वाटी सनफ्लावर च्या बिया

              6) पाऊण वाटी कोहळ्याच्या बिया

              7) एक दीड चमचा खसखस

              8) दोन ते तीन चमचा किसमिस

              9)एक ते दीड कप नारळाचा कीस

            10) दोन ते तीन चमचे तूप

            11) एक चमच सहद

ड्रायफ्रूट्स लाडू बनवण्याची पद्धत

1) सर्वात आधी आपण 200 ग्रॅम खजूर घेऊया आणि त्यामधील बी काढून घ्यायचे आहे. कारण मिक्सरमध्ये बारीक करताना खजूरच्या बिया अडखळतात आणि त्यामुळे मिक्सरच्या भांड्याचे पाते तुटण्याची शक्यता असते. म्हणूनच खजूर बारीक होणार नाही त्यासाठी सर्वात आधी खजूरच्या बिया काढून घ्यायच्या.

2) त्यानंतर गॅस वरती एक कढई ठेवायची आणि त्यामध्ये एक चमचा तूप टाकायचा आता तुपामध्ये एक कटोरी बदाम टाकायचे आणि ते व्यवस्थित भाजून घ्यायचे रंग बदलेपर्यंत आणि ते थोडे तडकायला लागेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. 

3) बदाम भाजून झाल्यानंतर बदाम काढून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच तुपामध्ये अक्रोड टाकायचे अक्रोड व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे अक्रोड भाजून झाले की ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. 

4) अक्रोड प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये एक वाटी काजू टाकायचं आणि काजू सुद्धा लालसर होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं काजू भाजून झाले की ते त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. 

5) काजू प्लेटमध्ये काढून झाले की त्याच तुपामध्ये सनफ्लॉवरच्या बिया आणि कोहळ्याच्या बिया टाकून व्यवस्थित भाजून घ्यायच्या ह्या बिया आपण असं तर नेहमी कधी खात नाही पण यामध्ये टाकल्यामुळे लहान मुले सुद्धा आवडीने खातील आणि ह्या बिया खूप पौष्टिक सुद्धा आहेत.

6) सनफ्लॉवरच्या बिया आणि कोहळ्याच्या बिया सुद्धा भाजून झाल्यानंतर सर्व एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. आता त्याच तुपामध्ये एक दीड चमचा खसखस टाकून परतून घ्यायचा खसखस परत थोडीशी परतून झाली की त्यामध्येच दोन ते तीन चमचे किसमिस टाकायची आहे. 

7) खसखस आणि किसमिस थोडा वेळ परतून झाली की त्यामध्येच नारळाचा कीस टाकायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा थोडावेळ नारळाचा किस परतून झाल्यानंतर सर्व मिश्रण थंड होण्यासाठी ठेवायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. 

8) कढईमध्ये थोडासा तूप टाकायचे आणि खजूर पूर्ण बारीक करून घ्यायचा आणि तो तुपामध्ये थोडासा परतून घ्यायचा खजूर पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा खजूर सॉफ्ट व्हायला लागला की नंतर गॅस बंद करायचे.

9) आता सर्व भाजून झालेले Dry Fruits एका पसरट लाकडी पाठीवरती ठेवायचे आणि चाकूने त्याचे बारीक काप करून घ्यायचे मिक्सरमध्ये बारीक केला तर ते सर्व पावडर बनवून जाणार म्हणून आपण त्याचे काप करून घेणार आहोत बारीक बारीक त्याचे सर्व काप करून घ्यायचे आहे. 

10) सर्व ड्रायफ्रूट्स चे व्यवस्थित काप करून झाले की ते एका कटोरी मध्ये टाकायचे नंतर त्यामध्ये सनफ्लॉवर च्या बिया आणि कोहळ्याच्या बिया टाकायच्या नंतर त्यामध्ये खसखस किशमिश खोबरा कीस भाजून घेतलेला टाकायचे आणि आपण परतून घेतलेला खजुर टाकायचा हा सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि नंतर त्यावरती एक चमचा सहद टाकायचा. सहद आपल्यासाठी आपल्या शरीरासाठी चांगला आहेच पण त्यामुळे लाडू सुद्धा व्यवस्थित बांधले जाणार. सहद टाकल्यानंतर सर्व मिश्रण छान फिरवून घ्यायचे आणि एक चमचा घ्यायचा आणि त्याच्यात सर्व ड्रायफ्रूट्स मिश्रण हातावरती घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे लाडू तयार करायचे. 

11) Dry Fruits laddu तयार झाल्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये ते काढून घ्यायचे. काचेच्या बरणीमध्ये लाडू ठेवल्यामुळे लाडू खूप दिवस टिकतात ते रोज सकाळी उठल्यानंतर एक लाडू लहान मुलांना किंवा घरातील व्यक्तींना द्यायचा सर्वांच्या शरीरासाठी पौष्टिक असा लाडू तयार आहे.

Leave a comment