काकडी मेथी थालीपीठ
(Kakadi Mathi Paratha In Marathi)
आज आपण बनवणार आहोत काकडीचे मेथी टाकून थालीपीठ. हे थालीपीठ खायला खूप स्वादिष्ट आणि चवीला खूप चवदार लागतात. काकडी मेथी थालीपीठ पौष्टिक तर असतेच त्याचबरोबर लहान मुले आवडीने खातात त्यांना थालीपीठ खायला खूप आवडते एखाद्या दिवशी मुलांना रोज रोज पोळी भाजीचा डबा घेऊन जातात. त्यांना वेगळे काही डब्यामध्ये पाहिजे असतो किंवा घरी सुद्धा आपण रोज तेच ते जेवण खाऊन थोडासा आपल्याला सुद्धा वेगळा काहीतरी टेस्टी खाण्याची इच्छा होते तेव्हा सुद्धा आपण हा थालीपीठ खाऊ शकतो. लहान मुले तर या थालीपीठाला नाही म्हणत नाही.थालीपीठ लोणचं सोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकतात खूप छान वाटतो.
थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य
साहित्य:-
1)- एक काकडी
2)- एक जुडी मेथी भाजी
3)- एक ते दीड वाटी गव्हाचे पीठ
4)- दोन-तीन चमचे तांदळाचे पीठ
5)- दोन ते तीन चमचे तीळ
6)- पाव चमचा ओवा
7)- कोथिंबीर
8)- लाल तिखट
9)- हळद पावडर
10)- चवीनुसार मीठ
थालीपीठ बनवण्याची पद्धत
कृती:-
1)- थालीपीठ बनवण्यासाठी सर्वात आधी काकडी किसणीने किसून घ्यायची काकडी किसून झाली की त्यामध्ये मेथीची पाने तोडून स्वच्छ धुऊन किसून घेतलेल्या काकडीमध्ये टाकायचे.
2)- नंतर त्यामध्ये गव्हाचे पीठ थोडासा तांदळाचे पीठ आणि नंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचे तीळ थोडासा ओवा हातावर चोळून टाकायचा.
3)- नंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं.
4)- सर्व मिश्रण एकजीव करून झाला की गॅस वरती तवा ठेवायचा. तवा थोडा गरम होऊ द्यायचा आणि तव्यावरती थोडासा तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर भिजवलेला मिश्रण थोडासा घ्यायचा.आणि तव्यावरती पसरवायचं थोडा पातळसर पसरवायचा आणि त्याला झाकून द्यायचा.
5)- थोडा वेळ त्याला तसंच शिजु द्यायचा थालपीठ पकल्यानंतर त्याची झाकणी खोलून त्याला दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडने त्याला शिजू द्यायचा. आणि नंतर थोड्यावेळाने ते काढून घ्यायचं.
हे थालीपीठ आपण लोणच्या सोबत किंवा सॉस सोबत किंवा चटणी सोबत कशा सोबत ते खाऊ शकतो लोणच्या सोबत तर याची चव खूप अप्रतिमच वाटते आणि लहान मुलं सुद्धा हे थालीपीठ आवडीने खातात आणि मेथी टाकली असल्यामुळे लहान मुलांसाठी खूप पौष्टिक असते.