भाजणी चकली रेसिपी (Bhajli Chakali Recipe in marathi)

     भाजणी चकली रेसिपी 

(Bhajli Chakali Recipe in marathi)

        आज आपण भाजणी चकली रेसिपी बघणार आहोत. भाजणीची चकली खुसखुशीत आणि खमंग बनते. चकली म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटायला लागतं चकली सर्वांनाच आवडत असते. चकली हे दिवाळीचा खास बेत असतो. दिवाळीला असा कोणताच घर नाही की जिथे चकली बनवली जात नाही. सर्व घरी चकली बनवतात मग त्यात मध्ये भाजणी चकलीचे प्रमाण अचूक असणे गरजेचे आहे. म्हणूनच आपण आज भाजणी चकलीचा अचूक प्रमाण लक्षात घेऊन मी तुम्हाला आज भाजणी चकली कशी बनवायची ते सांगणार आहे चला तर बघूया भाजणी चकली कशी बनवायची.

भाजली चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य 

साहित्य :-

              1) चार वाटी जुने तांदूळ

              2) दोन वाटी चणाडाळ

              3) एक वाटी उडीद डाळ

              4) अर्धी वाटी मुगाची डाळ

              5) एक वाटी पोहे

              6) अर्धी वाटी साबुदाणा

              7) अर्धी वाटी धने

              8) पाव वाटी जिरे

              9) दोन चमचे लाल तिखट

             10) अर्धा चमचा हळद

             11) चवीनुसार मीठ

             12) एक चमचा ओवा 

             13) पांढरे तीळ

             14) तेल

आता आपण भाजणी चकली कशी बनवायची याची कृती बघून घेऊ.

कृती:- 

         1)- सर्वात आधी भाजणी चकली बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ स्वच्छ पाण्याने धुऊन त्याला एका चाळणी मध्ये काढून ठेवून नंतर सुती कापडावर ती पसरवून ठेवून द्यायचा आणि पंख्याखाली त्याला सुकवून  द्यायच.

        २)-नंतर चणाडाळ ओल्या कापडावर ती छान पुसून घ्यायची त्याचप्रमाणे उडदाची डाळ आणि मुगाची डाळ सुद्धा ओल्या कापडाने पुसून घ्यायची आणि थोडेसे पसरवून ठेवायचे.

          ३)-तांदूळ सुकल्यानंतर गॅस वरती एक जाडसर कढई ठेवायची आणि त्यामध्ये तांदूळ थोडे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे खूप लालसर पण नाही थोडासा त्याचा रंग बदलेपर्यंत छान परतून घ्यायचा त्याला अधून मधून आलटून पालटून फिरवत राहायचं तांदळाचा रंग बदलायला लागला की त्याला एका परात मध्ये काढून ठेवायचा.

          ४)- नंतर त्याचप्रमाणे चणाडाळ सुद्धा भाजून घ्यायची चना डाळ भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो चणाडाळीचा रंग बदलेपर्यंत थोडा अलटून पालटून फिरवून तो भाजत राहायचा चना डाळीचा रंग बदलायला लागला की तो सुद्धा एका परात मध्ये काढून घ्यायचा.

           ५)- नंतर उडदाची डाळ सुद्धा हलका रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे उडदाच्या डाळीचा रंग बदलायला लागला की तो सुद्धा परत मध्ये काढून घ्यायचा.

          ६)- आता मुगाची डाळ सुद्धा हलका रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा डाळीला  आलटून पलटून फिरवत भाजत राहायचं आणि त्याचा रंग बदलायला लागला की  परात मध्ये काढून ठेवायचा.

             ७)- आता पोहे कुरकुरीत होत पर्यंत भाजून घ्यायचे पोहे छान कुरकुरीत भाजून झाले की ते सुद्धा परात मध्ये काढून घ्यायचे. पोहे आपण जाड किंवा पातळ कोणतेही वापरू शकतो.

            ८)- आता साबुदाणा भाजून घ्यायचा साबुदाण्याचा रंग बदलेपर्यंत आणि तो फुले पर्यंत भाजून घ्यायचा साबुदाणा फुलला आणि त्याचा थोडासा रंग बदलायला लागला की तो सुद्धा परात मध्ये काढून घ्यायचा.  भाजण्यासाठी घाई करायची नाही मंद आचेवर ती हळूहळू सर्व साहित्य भाजत राहायचे.

            ९)- आता धने भाजून घ्यायचे धणे कढईमध्ये टाकून मंद गॅस वरती हळूहळू त्याचा पण रंग बदलेपर्यंत भाजत राहायचं आणि धने भाजून झाल्या नंतर धने सुद्धा परात मध्ये काढून ठेवायचे.

            १०)-आता जीरा सुद्धा भाजून घ्यायचा जिरा भाजून झाल्यानंतर सर्व मिश्रण एका परात मध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि गिरणी वरून दळून आणायचं गिरणीवर दळत असताना तो पीठ डाळीवरती  किंवा भाजणीच्या पिठावर ते दळला जावा याकडे लक्ष द्यायचा.

          ११)- पीठ दळताना गव्हाचा पीठ किंवा ज्वारी बाजरीच्या पिठावर दळला जावा नाही याकडे आपल्याला खास लक्ष द्यायचा आहे.  यासाठी आपण गिरणीवाल्याकडे आपण रिक्वेस्ट करू शकतो.

            १२)- पीठ दळून आणल्यानंतर आता आपण त्याचे चकल्या करायला घेऊया चकली करण्यासाठी एका परात मध्ये चार वाटी पीठ घेऊया नंतर त्यामध्ये एक चमचा ओवा हातावरती चोळून घालायचा आहे नंतर त्यामध्ये चार चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्या पिठामध्ये टाकायचा यापेक्षा जास्त तेल टाकायचं नाही नाहीतर आपली चकली मोडू शकते.

           १३)-  नंतर सर्व मिश्रण आपल्या हाताने छान चोडून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये दोन चमचे तिखट किंवा आपल्याला जेवढा तिखट लागतो तेवढा अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यायचं.

           १४)- सर्व मिश्रण एकजीव करून झाला की त्याला कोमट पाणी घालून थोडा थोडा मिश्रण भिजवून घ्यायचं मिश्रण भिजवत असताना घाई करायची नाही थोडा थोडा पाणी घालूनच मिश्रण भिजवून घ्यायचा गोळा खूप घट्ट  झाला  नाही पाहिजे आणि साहिल पण झालं नाही पाहिजे याकडे लक्ष द्यायचा.

              १५)- म्हणूनच आपण जेव्हा भिजवत असतो तेव्हा थोडं थोडं पाणी घालूनच मिश्रण भिजवून घ्यायचं आणि घट्टसर गोळा करून घ्यायचा खूप घट्ट झाला असेल तर थोडासा कोमट पाणी घालून त्याला थोडासा सेल करून घ्यायचा.

         १६)-आता चकली करायला घ्यायची आहे चकली करण्यासाठी गॅस वरती कढईमध्ये तेल टाकून तेल मध्यम गरम होऊ द्यायचा खूप कडकडीत पण गरम होऊ द्यायचं नाही नाहीतर आपली चकली जळून जाईल म्हणूनच मध्यम तेल गरम करून घ्यायचा.

           १७)- चकली एकसारखी आली पाहिजे म्हणून एक सारख्या आकाराच्या चार प्लेटा घ्यायच्या आणि त्यावरती चकल्या पिळून घ्यायच्या म्हणजे चकल्या गोल एकसारख्या आकाराच्या होतात आणि एका वेळी आपण कढईमध्ये चार चार चकली टाकू शकतो त्यापेक्षा जास्त पण टाकायचे नाहीत कढईमध्ये जेवढी चकली होऊ शकते तेवढीच टाकायचे नाही तर चकली तुटू शकते.

         १८)- चकली तळत असताना घाई करायची नाही चकली थोडा वेळ तेलामध्ये तशीच राहू द्यायची आणि थोडा वेळानंतर त्याला पलटून घ्यायची आणि चकलीचा रंग बदलेपर्यंत थोडासा गोल्डन होईपर्यंत त्याला परतून घ्यायचा आणि चकलीचा थोडासा गोल्डन रंग झाला की नंतर त्याला झाऱ्यावरती  काढून घ्यायचा आणि त्याच्यातील तेल काढून  घ्यायचा आणि नंतर प्लेट वरती काढून घ्यायचं.

टीप:- भाजणी चकली करत असताना थंड पाण्याचा वापर करायचा नाही पाणी थोडासा कोमट करूनच मिश्रण भिजवून घ्यायच.

           

Leave a comment