सांभार वडी, पुडाची वडी रेसिपी ( Sambarvadi Recipes in Marathi )

  सांभार वडी, पुडाची वडी रेसिपी ( Sambarvadi Recipes in Marathi )

आता हिवाळा चालू आहे हिवाळ्यामध्ये सांबार भरपूर प्रमाणात मिळते आणि आणि सांबार खूप ताजं ताजं आणि खूप छान मिळते म्हणूनच जास्त प्रमाणात सांभार मिळाल्यामुळे महिलावर्ग मोठ्या प्रमाणात सांभार वडी बनवतात आणि ती सांभार वडी खायला खूप छान वाटते आणि सगळ्यांना खूप आवडते पण जी लहान मुले सांभार खात नाही अशी मुले सुद्धा सांभार वडी खातात सांभारवाडीमध्ये खूप प्रकारचे जिन्नस टाकल्यामुळे ते आणखी पौष्टिक बनते सांबर वडीची चव खूप रुचकर लागते.  चला तर आता आपण सांभार वडी कशी बनवायची ते बघणार आहोत.

सांभार वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

साहित्य:-

          1)- एक पाव सांभार

          2)- दोन चमचे खसखस

          3)- एक वाटी शेंगदाणे

          4)- एक वाटी खोबरा कीस

          5)- अर्धी वाटी तीळ

          6)- अर्धा लिंबू

          7)- दोन कांदे

          8)- लाल तिखट

          9)- हळद

         10)- चवीनुसार मीठ

         11)- एक चमचा साखर

         12)- दोन वाटी मैदा

         13)- अर्धी वाटी बेसन

         14)- तेल

चला तर आता सांभार वडी कशी बनवायची ते बघूया

कृती:- 

1)- सर्वात आधी आपण सांभारवाडी बनवण्यासाठी लागणारी पारी बनवण्यासाठी आपण पीठ मळून घेऊया. पीठ मळून घेण्यासाठी एक परात घ्यायची त्यामध्ये दोन वाटी मैदा आणि अर्धी वाटी बेसन घ्यायचं त्यामध्ये ओवा ओवा थोडासा हातावर तोडून टाकायचा.

2)- अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून मिश्रण व्यवस्थित फिरवून घ्यायचं मिश्रण व्यवस्थित फिरवून झालं की गॅस वरती एक छोटा फॅन ठेवून त्यामध्ये एक डवला तेल गरम करून घ्यायचा तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं तेल कडकडीत गरम झालं की मिक्स केलेल्या सारं वरती मोहन टाकायचं मोहन टाकून झाल्यानंतर पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं पिठाचा गोळा थोडासा घट्टसरच ठेवायचा घट्टसर गोळा भिजवून झाला की झाकून ठेवून द्यायचं.

3)-  सर्वात आधी पाण्याने सांभार स्वच्छ धुऊन घ्यायचा आणि सांबार धुवून झाल्यानंतर त्याला फॅनच्या हवेमध्ये थोडा सुकवून घ्यायचा सांबार सुकल्यानंतर त्याला बारीक बारीक कापून घ्यायचं.आता खोबरा डोलाचा किस काढून घ्यायचा डोलाचा एक वाटी किस निघेल इतका किसून घ्यायचा खोबरा कीस किसून झाला की तो थोडा कढईमध्ये परतून घ्यायचा.

4)- आता शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाले की  मिक्सरमध्ये थोडासा जाडसर फिरवून घ्यायचं. आणि आता तीळ भाजून घ्यायचे तीळ सुद्धा भाजून झाले की थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा.

आता आपण सांभाराची भाजी तयार करून घेऊ त्यासाठी सर्वात आधी गॅस वरती एक कढई ठेवायची  त्यामध्ये एक डौला तेल टाकायचा तेल जास्त टाकायचा नाही नाहीतर भाजी तेलकट वाटते. तेल गरम झाला की त्यामध्ये मोहरी टाकायची.

5)- मोहरी तडतडायला लागली की नंतर त्यामध्ये दोन बारीक कापलेले कांदे टाकायचे कांदे थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे कांदे सॉफ्ट झाले की नंतर त्यामध्ये हिरवी मिरची बारीक कापून टाकायची अर्धा चमचा हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचा चवीला बॅलेन्स करण्यासाठी थोडीशी साखर टाकायची. आणि नंतर खसखस टाकायची, खोबरा कीस टाकायचा खोबरा किस थोडावेळ परतून घ्यायचा.खोबरा कीस परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक केलेले शेंगदाणे तीळ टाकायचे. आणि व्यवस्थित परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला सांबार टाकायचं.

6)- सांभार वरती अर्धा लिंबू पिळून टाकायचं आणि मिश्रण फिरवून घ्यायचा सांबार खूप शिजू द्यायचा नाही त्याची वाफ येईपर्यंत त्याला फक्त गॅस वरती ठेवायचा सांबराच्या मिश्रणाला वाफ यायला लागली की गॅस बंद करून द्यायचा संभाराची भाजी तयार होऊन जाईल. आता सांबार भाजीला थंड व्हायला ठेवायचा भाजी थंड झाली की मळून घेतलेला पीठ पुन्हा हाताने थोडासा मळून घ्यायचा आणि त्याची छोटी पोळी लाटून घ्यायची पोळी वरती थोडीशी भाजी ठेवायची आणि त्याला दुमडून घ्यायचं दुमडून झाल्यानंतर दोन्ही साईड ने कडा बंद करायच्या अशाच प्रकारे पूर्ण सांभार वडी तयार करायची सर्व सांबार वडी तयार झाली.

7)- तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम झाला की नाही ओळखण्यासाठी छोटासा गोळा त्यावरती टाकून बघायचा पिठाचा गोळा थोडासा वरती तरंगायला लागला की तेल व्यवस्थित तळण्यासाठी गरम झाला समजायचं आणि नंतर सांभारवडी सोडायची तेलामध्ये जेवढ्या आपल्या सांभार वड्या तळून होतील तेवढ्या वड्या टाकायच्या सांभारवाडी तळत असताना सोडल्याबरोबर त्याला चमचा लावायचा नाही थोडा वेळ त्याला तेलामध्ये होऊ द्यायचं आणि नंतर त्याला पलटवून घ्यायचं आटून पालटून तळून झालं त्याला गोल्डन ब्राऊन कलर आला की नंतर सांबरवडी प्लेटमध्ये काढून घ्यायचे अशाप्रकारे झाली आपली सांभार वडी तयार.

Leave a comment