खमंग चिवडा रेसिपी (Poha Chivda Recipe In Marathi)
खमंग चिवडा म्हटला की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटायला लागतं. चिवडा सगळ्यांच्या आवडीचा असतो असं कोणीच नाही का ज्याला चिवडा आवडत नाही दिवाळीच्या दिवसात चिवडा मोठ्या प्रमाणात बनवला जातो. तर कधी पाहुणे आल्यानंतर नाश्त्यासाठी सुद्धा आपण चिवडा बनवतो, घरी आवड आली म्हणून सुद्धा आपण चिवडा बनवतो. चिवड्या सोबत उसळ खायला खूप छान वाटते, चिवडा आणि उसळ याच कॉम्बिनेशन खूप छान, चिवड्यामध्ये उसळ टाकून खाल्ला की तो खायला खूप छान वाटतो आणि मोठ्यांना लहान मुलांना खूप आवडतो. आपल्या महाराष्ट्रातील फराळाच्या प्रकारामध्ये चिवडा हा सुद्धा एक प्रकार समाविष्ठ आहे. चिवडा जेवढा कडक बनवला जातो तेवढा तो खमंग आणि रुचकर लागतो. आता आपण चिवडा कसा बनवायचा ते बघूया.
चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
साहित्य:-
1) पातळ पोहे एक किलो
2) शेंगदाणे एक पाव
3) दाडया अर्धा पाव
4) एक मोठा कांदा किंवा दोन छोटे
5) हिरवी मिरची पाच ते सहा
6) कढीपत्ता
7) धने
8) खसखस
9) जीरा
10) मोहरी
11) तीळ
12) सोप
13) खोबऱ्याचे काप
14) लसूण पाकळ्या चार-पाच
15) हळद पावडर
16) लाल तिखट
17) मीठ
18) साखर
चिवडा बनवण्याची पद्धत
स्टेप 1)- चिवडा बनवण्यासाठी सर्वप्रथम पातळ पोहे चाळणीने साफ करून घ्यायचे. नंतर गॅस वरती एक मोठा भांड ठेवून त्यामध्ये पोहे छान कुरकुरीत भाजून घ्यायचे.
स्टेप 2)- पोहे एक किलो असल्यामुळे अर्धा अर्धा किलो छान कुरकुरीत होत पर्यंत भाजून घ्यायचे. भाजताना ते थोड्या थोड्या वेळाने आलटून पलटून फिरवत राहायच.
स्टेप 3)- पोहे छान कुरकुरीत भाजून झाले की ते बाजूला ठेवून आता चिवड्याचा सारण तयार करायचा चिवड्याचा सारण तयार करण्यासाठी गॅस वरती एक मोठा भांडा ठेवून त्यामध्ये सहा ते सात टेबलस्पून तेल टाकायचं.
स्टेप 4)- तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आधी शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाणे तडतडायला लागले की ते तेलामधून काढून घ्यायचे.
स्टेप 5)- त्यामध्ये खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे आणि नंतर तेलामधून काढून घ्यायचे नंतर तेलामध्ये खसखस जीरा मोहरी सोप धने थोडेसे तीळ टाकायच आणि नंतर त्यामध्ये लसूण पाकळ्यांचे बारीक काप करून टाकायचे.
स्टेप 6)- त्यामध्ये कांदा आणि मिरची फ्राय करायला टाकायची कांदा थोडा लालसर व्हायला लागला की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि नंतर त्या सर्वांना छान परतून घ्यायचा.
स्टेप 7)- त्यामध्ये चवीपुरता लाल तिखट हळद आणि मीठ टाकून छान परतून घ्यायचा हे सर्व परततानाच दाढया टाकून छान परतून घ्यायचा.
स्टेप 8)- थोडावेळ हे सर्व परतून झाल्यानंतर यामध्येच आपण तळून घेतलेले खोबऱ्याचे काप आणि शेंगदाणे टाकून फिरवून घ्यायचा.
स्टेप 9)- भाजून घेतलेले पोहे टाकून छान परतून घ्यायचा सर्व चिवडा छान मिक्स करून घ्यायचा. नंतर गॅस बंद करून थोडा थंड झाल्यानंतर त्यामध्ये साखर टाकायची आणि परतून घ्यायचा.
साखर टाकल्यामुळे चिवड्याला एक वेगळीच चव येते आणि चिवडा खायला खूप रुचकर लागतो. या पद्धतीने चिवडा बनवल्यामुळे चिवडा खूप खमंग होतो आणि झटपट चिवडा तयार होतो.
.