डाळ भाजी रेसिपी (Dal Bhaji Recipe In Marathi)
डाळ भाजी म्हणजे त्यामध्ये सर्व प्रकारच्या डाळी असतात आणि त्यामध्ये पालेभाजी सुद्धा असते. त्यामुळे ती खायला खूप अप्रतिम वाटते. तिच्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते लहान मुलांना मोठ्यांना त्याची चव खूप आवडते ते आपण चपाती सोबत भातासोबत आवडीने खाऊ शकतो त्यामध्ये सर्व प्रकारच्या डाळी आल्यामुळे प्रोटीन फायबर विटामिन युक्त असते त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघू.
साहित्य:-
१) अर्धी वाटी तूर डाळ
२) पाव वाटी चणाडाळ
३) पाव वाटी मुगाची डाळ
४) पावभाजी मसूर डाळ
५) एक पाव पालक
६) शेंगदाणे
७) एक मोठा टोमॅटो, किंवा छोटे छोटे दोन
८) एक कांदा
९) दोन हिरवी मिरची दोन लाल मिरची
१०) कढीपत्ता
११) कोथिंबीर
१२) जीरा, मोहरी
१३) आलं लसूण पेस्ट
१४) हिंग
१५) तेल
आता आपण डाळ भाजी कशी बनवायची ते बघूया :-
डाळ भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका कुकरमध्ये सर्व प्रकारच्या डाळी टाकून घेऊ आणि डाळ स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुऊन घेऊ आणि नंतर त्यामध्ये हळद आणि तेल घालू नंतर त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे पालक भाजी घालू आणि कुकर बंद करून गॅसवर चार सिटी होईपर्यंत शिजू देऊया.
कुकर झाल्यानंतर त्याला फोडणी देण्याची क्रिया करू फोडणी देण्यासाठी एक पॅन घेऊ आणि त्यामध्ये तीन मोठे चमच तेल टाकूया तर त्यामध्ये तेल गरम झाला की त्यामध्ये मोहरी जीरा, हिंग हिरवी मिरची कढीपत्ता कांदा छान परतून घेऊया. नंतर कांदा हिरवी मिरची थोडासा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आले लसूण पेस्ट टाकूया आणि छान परतून घेऊया नंतर त्यामध्ये टमाटर टाकून त्यावर हळद तिखट मीठ आपल्याला किती प्रमाणात लागते ते पाहून सर्व टाकून छान फिरवून घेऊया.
नंतर डाळ भाजी कुकरमध्ये झालेली आहे. त्याला पूर्ण रवीने घोटून न घेता त्याला चमच्याने थोडं फिरवून त्याला फोडणीच्या सारणामध्ये टाकून त्याला फिरवून घेऊ आणि एक उकळी आल्यानंतर त्यावर कोथिंबीर टाकून उतरवून घेऊ झाली डाळ भाजी तयार.
हिवाळ्यामध्ये डाळ भाजीला हिरव्या कांद्याच्या पाल्याने पण फोडणी देतात. हिवाळ्यामध्ये हिरवा कांद्याची पाल भरपूर प्रमाणात निघते आणि डाळभाजीत टाकल्यानंतर ती खूप सुंदर लागते आणि हिवाळ्यात पालेभाज्या पण खूप प्रमाणात निघते पालक मेथी सांबार हिरवा हिरवा खूप छान मिळतो. त्यामुळे भाज्यांना अधिकच चव येते आणि खायला खूप रुचकर लागते.