मसाले वांगे रेसिपी (Masale Wange recipe in Marathi)
साहित्य :–
१) अर्धा किलो वांगे छान ताजे
२) एक टोमॅटो
३) एक कांदा
४) दहा लसूण पाकळ्या
५) एक तुकडा अद्रक
६) धने
७) जीरा
८) खसखस
९) तीन-चार काळेमिरे
१०) एक मोठी विलायची
११) एक लहान विलायची
१२) दोन लवंग
१३) एक छोटा कलमीचा तुकडा
१४) थोडेसे शेंगदाणे
१५) थोडेसे दाडया
१६) शहाजीरा
१७) एक कर्ण फुल
१८) दगडफूल
१९) तेल
आता आपण मसाले वांगी कसे तयार करायचे ते बघूया.
स्टेप १ :- मसाले वांगे तयार करण्यासाठी सर्वप्रथम आधी आपण मसाले तयार करून घेऊया त्यासाठी आपण तव्यावर एक कांदा कापून तव्यावर तेल घालून थोडा परतून घेऊया नंतर छोटा खोबऱ्याचा तुकडा घेऊन तो गॅसवर थोडा भाजून घेऊया नंतर हे सर्व भाजून झाल्यानंतर थोडे धने, जिरा, खसखस, मोठी विलायची, लहान विलायची, लवंग, कलमी चा तुकडा, शेंगदाणे दाणे, शहाजिरे, करणे फुल थोडे दगडफूल हे सर्व तव्यावर थोडे तेल टाकून भाजून घेऊया नंतर हा मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया.
स्टेप २ :- मसाला बारीक करून झाल्यानंतर आपण गॅसवर एक भांड ठेवून त्यामध्ये चार डवले तेल घालूया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक कांदा बारीक बारीक कापून घालूया कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊया नंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि ते परतून झाल्यानंतर आपण जो मसाला तयार केला आहे. त्यामधील थोडा मसाला ठेऊन बाकी मसाला घालूया आपण मसाला आधीच भाजलेला असल्याने त्याला खूप जास्त वेळ भाजून घ्यायची गरज नाही.
स्टेप ३ :- सदर मसाल्या मध्ये आपण एक टोमॅटो बारीक कापून टाकून घेऊ नंतर त्यामध्ये हळद तिखट आणि मीठ घालून घेऊया. आणि त्यामध्ये मसाला मधला थोडासा पाणी घालून घेऊ आपण दिलेल्या फोडणीला तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचा.
स्टेप ४ :- फोडणीला तेल सुटे पर्यंत आपण वांग्याचे मधामधातून अर्धे अर्धे काप करून वांगी कापायचे आणि आपण बाजूला ठेवलेला थोडा मसाला काप केलेल्या वांग्यांना लावून घ्यायचा नंतर आपण जो मसाला तेल सुटे पर्यंत शिजत ठेवला आहे त्यामध्ये कापून मसाला लावलेली वांगी टाकून द्यायचं वेवस्तीत फिरवून झाल्यावर तसंच थोडावेळ शिजू द्यायचा. जेव्हा वांगे अर्धवट शिजत येतील तेव्हा त्यामध्ये थोडासा आपल्याला लागेल तेवढा पाणी घालायचं आणि थोडा वेळ शिजू द्यायचा आणि शिजल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून उतरवून घ्यायचे. झाली आपली मस्त रुचकर मसाले वांगे तयार.