मशरूमची रेसिपी
(mushroom recipe in marathi)
तर आज आपण मशरूमची भाजी बनवणार आहोत. मशरूम हे पावसाळ्यामध्ये मिळत असतात. मशरूम मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी तर उत्तम प्रोटीन स्रोत मशरूम आहे. मशरूम मसालेदार तयार झाल्यामुळे ती नॉनव्हेज सारखीच वाटते आणि मशरूमची भाजी चवीला खूप चवदार असते. मशरूम हे जंगलामध्ये उगवते किंवा काही शेतकरी याचे पीक घेतात. काही प्रकारचे मशरूम हे फक्त पावसाळा सीजन मध्येच आपल्याला दिसतात. म्हणूनच रानभाज्या पावसाळ्यामध्ये खायलाच पाहिजे त्यामध्ये खूप सारे पौष्टिक तत्व असतात. मशरूम मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते आणि मशरूमची भाजी (mushroom recipe in marathi) चवीला खूप रुचकर लागते. आणि ती आपण भाकरी सोबत चपाती सोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकतो.
मशरूमची भाजी बनवण्याचे साहित्य :-
साहित्य:-
1)- तीन कांदे
2)- दोन हिरवी मिरची
3)- दोन टमाटर
4)- आलं लसणाची पेस्ट
5)- धने
6)- जीरा
7)- खोबऱ्याचा तुकडा
8)- गरम मसाला
9)- दही
10)- कोथिंबीर
11)- अर्धा चमचा हळद पावडर
12)- एक ते दीड चमचा लाल तिखट
13)- चवीनुसार मीठ
14)- एक पाव मशरूम
मशरूमची भाजी बनवण्याची पद्धत
स्टेप1)- मशरूमची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी मशरूम स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे मशरूमला माती लागून असल्यामुळे त्याला खूप स्वच्छ धुवावे लागते.
स्टेप 2)- मशरूम स्वच्छ धुऊन झाल्यानंतर त्याचे काप करून घ्यायचे. मशरूम चे काप करून झाल्यानंतर तीन कांदे बारीक बारीक कापून घ्यायचे. नंतर दोन मिरच्या कापून घ्यायच्या आणि दोन टमाटर ची पेस्ट बनवून घ्यायची.
स्टेप 3)- खोबऱ्याचा तुकडा गॅस वरती थोडा भाजून घ्यायचा आणि गॅस वरती तवा ठेवून थोडे धने आणि जिरे भाजून घ्यायचे. भाजून घेतल्यामुळे त्याची चव खूप छान लागते.
स्टेप 4)- भाजून घेतलेला खोबऱ्याचा तुकडा आणि धने जिऱ्याची बारीक पेस्ट करून घ्यायची. आणि आले लसणाची पेस्ट तयार करून घ्यायची. पेस्ट तयार झाल्यानंतर गॅस वरती एक कढई ठेवायची आणि कढईमध्ये तीन टेबलस्पून तेल टाकायचा तेल गरम झाले की त्यामध्ये बारीक कापून घेतलेले कांदे टाकायचे.
स्टेप 5)- कांदे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे. कांदे लालसर व्हायला लागले की त्यामध्ये दोन हिरवी मिरची टाकायची आणि आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि परतून घ्यायचे.
स्टेप 6)- नंतर किसलेला टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटो परतून घ्यायचा टोमॅटो परतून झाला की त्यामध्ये अर्धा चमचा हळद, एक ते दीड चमचे तिखट टाकायचे आपल्याला किती तिखट हव आहे त्यानुसार तिखट टाकायचं. आणि चवीनुसार मीठ टाकून परतून घ्यायच.
स्टेप 7)- नंतर त्यामध्ये धने, जिरे आणि खोबऱ्याचे वाटण केलेलं आहे. ते टाकून परतून घ्यायच आणि एक चमचा गरम मसाला टाकायचा आणि परतून घ्यायच. मसाला परतून झाल की गॅस कमी करायच आणि त्यामध्ये दोन चमचे दही टाकायचे आणि परतून घ्यायचा मसाला जळू नये यासाठी थोडासा पाणी टाकायचं आणि त्याला व्यवस्थित फिरवून तेल सुटेपर्यंत त्याला शिजू द्यायच.
स्टेप 8)- मसाल्याला तेल सुटायला लागलं की कापलेले मशरूम टाकायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायच आणि मंद आचेवर त्याला शिजू द्यायच. मशरूम मध्ये पाणी भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्याला आपोआपच पाणी सुटते. थोड्या वेळानंतर भाजी परतून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला थोडासा पाणी टाकायचं आहे. थोडासा पाणी घालून फिरवून पाच मिनिटं शिजू द्यायच.
स्टेप 9)- पाच मिनिटं मशरूम व्यवस्थित शिजले की त्यावरती कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा झाली आपली मशरूमची भाजी तयार.
mushroom recipe in marathi टीप :- मशरूम मध्ये भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे मशरूमच्या भाजीला जास्त पाणी टाकण्याची गरज नाही. मशरूमची भाजी मसालेदारच बनवली जाते. मशरूमच्या भाजीला खूप जास्त रस्सा चांगला वाटत नाही. मशरूमची भाजी कमी पाण्याचा वापर करून तयार केली जाते.