फणसाची भाजी (Fansachi Bhaji recipe in Marathi) (Jackfruit curry recipe)
आता आपण फणसाची भाजी कशी बनवणार आहोत ते बघूया. खूप जणांना फणस खूप आवडतो लहान मुलांना शक्यतो आवडत नाही पण कुणाकुणाला खूप आवडते फणसाचे फळ हे हिवाळा व उन्हाळ्या मध्ये खूप प्रमाणात येत असते त्यामुळे बाजारत सुद्धा फणस खूप मोठ्या प्रमाणात विकायला असतो. आजकाल तर फणसाचे काप कण करून दिल्यामुळे गृहिणींना तेवढा कापण्याचा वगैरे त्रास होत नाही. आधी घरी फणस घेऊन आणल्यानंतर गृहिणींना खूप त्रास व्हायचा त्यामध्ये हाताला तेल लावायला लागायचं चाकूला तेल लावायला लागायचं. फणसाला कापताना ते चिकट चिकट हाताला लागायचं त्यामुळे खूप जणांना कंटाळा यायच. पण आता तसं होत नाही बाजारामध्ये आपण फणस घ्यायला गेल्यानंतर विक्री करणारे त्याचे काप करून देतात आणि ते घरी आणल्यानंतर आपल्याला फक्त त्याची भाजीच बनवायची असते. त्यामुळे फणसाची भाजी करणे खूप सोपं झालं आहे.
आता आपण फणसाच्या भाजीसाठी (Fansachi Bhaji Recipe) लागणारे साहित्य पाहून घेऊ.
साहित्य:- १) अर्धा किलो फणस
२) तीन चमचे तेल
३) कांदा
४) टमाटर
५) धने
६) जीरा
७) खसखस
८) शहाजीरा
९) मोठी विलायची एक
१०) लहान विलायची एक
११) दोन लवंग
१२) थोडेसे शेंगदाणे थोडेसे दाडया
१३) एक कलमी चा तुकडा
१४) दहा लसूण पाकळ्या
१५) एक छोटा अद्रक चा तुकडा
स्टेप १:- आता आपण मसाला कसा तयार करायचा ते पाहू सर्वात अधिक खोबऱ्याचा तुकडा गॅसवर भाजून घेऊ नंतर गॅसवर तवा ठेवून त्यावर सर्व मसाले भाजून घेऊ. त्यानंतर एक कांदा कापून घेऊन त्याला आधी तव्यावर भाजून घेऊ नंतर तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून नंतर तव्यावर जेवढे काही मसाले आपण काढून ठेवले आहे म्हणजेच धनी जिरा कलमी विलायची शेंगदाणे या खसखस लवंग सर्व आपण तव्यावर भाजून घ्याच आहे.
स्टेप २:- सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची बारीक पेस्ट तयार करून घेऊ या. आता आपण फणसाची भाजीला फोडणी देऊया. सर्वात आधी फोडणी देण्यासाठी एक कांदा बारीक बारीक कापून घेऊ नंतर तो फोडणी देण्यासाठी एका गंजामध्ये तीन डवले तेल टाकून घेऊ त्यामध्ये आपण बारीक कापून घेतलेला कांदा घालूया. कांदा लालसर होईपर्यंत छान परतून घेऊ कांदा लालसर परतून झाला की मग त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकू नंतर आपण मसाल्याची जी बारीक पेस्ट करून घेतली आहे ती पेस्ट टाकून त्याला छान परतून घेऊया.
स्टेप ३:- सदर फोडणी मध्ये टोमॅटो बारीक चिरून घालूया. मग त्यावरच पुन्हा हळद तिखट मीठ घालून त्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊया. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून या मसाल्यामध्ये थोडा पाणी सोडूया म्हणजे मसाले जळणार नाही.
स्टेप ४:-दिलेल्या फोडणीला तेल सुटायला लागला की आपण फणसाचे जे चौकोनी तुकडे स्वच्छ धुऊन फोडणीमध्ये सोडूया आणि त्याला छान परतून घेऊन मंद आचेवर थोडा वेळ शिजू द्यायच आहे. थोडा वेळ भाजी शिजल्यानंतर रसा किती प्रमाणात हवे त्याप्रमाणे आपण पाणी घालू शकतो. सादर भाजी शिजल्यानंतर त्यावर कोथिंबीर घालून फणसाची भाजी सर्व्ह करता येईल.