नारळाचा केक :-
नारळाचा केक बनविणे अगदी सोपे आहे याची चव खूप छान आणि चांगली आहे.
साहित्य:-
१) 170 ग्राम कनिक
२) 85 ग्रॅम लोणी
३) 100 ग्रॅम साखर
४) दूध
५) दोन अंडे
६) 85 ग्रॅम कोरडे नारळ
७) एक छोटा चमचा बेकिंग पावडर
कृती:-
१) लोणी आणि साखर चांगल्या तऱ्हेने मिक्स करून क्रीम बनवा आणि मग त्यात अंडे टाका
२) त्यानंतर कणीक थोडी थोडी करून मिक्स करा नंतर बेकिंग पावडर टाका नंतर नारळाचा कीस टाकून दूध थोडे थोडे टाकून मिश्रण छान एकजीव करून घ्या.
३) आणि नंतर मिश्रणाला एका भांड्याला तूप किंवा तेल लावून त्यामध्ये टाका आणि ओव्हन मध्ये अर्धा तास बेक होऊ द्या. अशाप्रकारे नारळाचा केक तयार होईल आणि हा केक पौष्टिक पण आहे आणि लहान मुलांना खूप आवडेल.