चिकन दम बिर्याणी रेसिपी
(chicken dum biryani recipe in marathi)
आज आपण चिकन बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत. चिकन बिर्याणी सर्वांनाच खूप आवडते. आपण चिकन नेहमी खात असतो चिकन खाणाऱ्यांसाठी काही नवीन स्पेशल म्हणून कधी कधी आपल्याला बिर्याणी पण खायला आवडते. पण ती बनवण्याची पद्धत खूप सारे जणांना माहीत नसते आपण बनवतो म्हटलं तर चिकन बिर्याणी बनवणं सुद्धा इतकं काही कठीण नाही आपण सुद्धा घरच्या घरी हॉटेल पेक्षाही छान घरी चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi) बनवू शकतो.
चिकन दम बिर्याणी बनवण्याची साहित्य
साहित्य:-
१)-एक किलो चिकन
२)- सहा सात कांदे
३)- नारळाचा छोटा तुकडा
४)- धने
५)- जीरा, शहाजीरा
६)- खसखस
७)- छोटी विलायची,भेंडी विलायची
८)- कर्णफुल
९)- दगडफूल
१०)- तेज पत्ता
११)- शेंगदाणे, दाडिया
१२)- लवंग
१३)- कलमी
१४)- कोथिंबीर
१५) बासमती तांदूळ अर्धा किलो
१६)-अर्धी वाटी दूध
१७)-केशर
१८)-दही
१९)-चिकन बिर्याणी मसाला
२०)-सहा ते सात कांदे बारीक कापून तळून घ्यायचे.
चिकन दम बिर्याणी बनवण्याची पद्धती
स्टेप 1)-सर्वात आधी बासमती तांदूळ अर्धा तास आधी स्वच्छ पाण्याने धुऊन भिजवून ठेवून द्यायचे.
स्टेप 2)- आता चिकन बनवण्याची पद्धत बघून घेऊ चिकन बनवण्यासाठी चिकनचा मसाला तयार करून घ्यायचा. त्यासाठी गॅस वरती नारळाचा तुकडा भाजून घ्यायचा
स्टेप 3)- गॅस वरती तवा ठेवून त्यावर थोडासा तेल टाकायचं आणि एक मोठा कांदा कापून घ्यायचा आणि तो छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा लालसर झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ठेवायच
स्टेप 4)- गॅस वरती तवा ठेवून थोडासा तेल टाकायचा आणि त्यामध्ये थोडेसे धने, जिरा, खसखस शहाजीरा कलमी भेंडी विलायची छोटी विलायची लवंग कर्णफुल चा तुकडा चार-पाच शेंगदाणे चार-पाच दाडया सर्व मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा भाजून झाल्यानंतर कांदे टाकलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा. आणि त्यामध्ये भाजलेल्या नारळाचे तुकडे कापून टाकायचे.
स्टेप 5)- सर्व मसाला मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचा.
गॅस वरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये चार ते पाच डवले तेल टाकायचं.
स्टेप 6)-सहा ते सात कांदे लांब लांब बारीक कापून घ्यायचे. आणि ते कांदे तेलामध्ये लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे. लालसर तळून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे.
स्टेप 7)-नंतर तेलामध्ये थोडेसे तळलेले कांदे आणि मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला चांगला परतून घ्यायचा.
स्टेप 8)-मसाला परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक टमाटर टाकायचं आणि परतून घ्यायचा नंतर हळद पावडर, तिखट, मीठ टाकून सर्व मसाला परतून घ्यायचा. नंतर त्यामध्ये चिकन बिर्याणी मसाला टाकायचा. आणि सर्व मसाला परतून घ्यायचा.
स्टेप ९)- गॅस कमी करून त्यामध्ये थोडासा दही टाकायचे आणि त्याला तेल सुटेपर्यंत छान शिजू द्यायचं. तेल सुटायला लागला की त्यामध्ये चिकन टाकायचे. चिकन गावठी असेल तर अर्ध शिजू द्यायचे. चिकन गावठी नसेल तर गॅस बंद करायचं चिकन मसाले मध्ये फिरवून ठेऊन द्यायचं.
स्टेप १०)- आत्ता आपल्याला हे सगळं करत असताना बासमती तांदूळ अर्धवट शिजवायचे आहे. त्यासाठी गॅस वरती एक मोठा भांड ठेवायचे त्यामध्ये अर्धागंज पाणी टाकायचं. पाणी उकळायला लागला की त्यामध्ये विलायची, भेंडी विलायची ,कलमी ,तेजपत्ता ,लवंग, काळीमिरी हे सर्व एका कापडामध्ये पोटली बांधून टाकायची.
पाणी छान उकडायला लागला की त्यामध्ये भिजवलेले बासमती तांदूळ टाकायचे आणि ते अर्धवट शिजवून घ्यायचे. व ते एका गाळणी मध्ये काढून त्यातील अतिरिक्त पाणी काढून घ्यायचे.
स्टेप ११)-नंतर गॅस वरती एक जाड पातेला ठेवून त्यामध्ये थोडासा तेल टाकायचं त्यामध्ये अर्ध शिजलेली चिकन किंवा नासिजलेले मसाल्यात मिक्स केले चिकन टाकायचे.
स्टेप १२)- नंतर त्यामध्ये बासमतीच अर्थ शिजवलेला राईस थर टाकायचा बासमती राईस थोडे टाकून झाल्यानंतर त्यावरती तळलेले कांदे पसरवायचे आणि त्यावर केशर दूध टाकायचे आणि थोडी कोथिंबीर पसरवायची
स्टेप १३)- एक लेयर झाल्यानंतर पुन्हा बासमती राईस पसरवायचा त्यावरती तळलेले कांदे पसरवायचे आणि त्यावरती केशर दूध टाकायचा. कोथिंबीर टाकायची.
स्टेप १४)-त्यावरती झाकण ठेवायच थोडीशी कणिक मळून घ्यायची आणि ती कणिक झाकणाच्या गोल गोल लावून घ्यायची म्हणजे झाकणामधून वाफ जाणार नाही. किंवा एक पाक बंद असलेले पातेले असेल तर ते सुद्धा वापरता येईल. त्यामध्ये कणिक लावाची गरज नाही.
स्टेप १५)-गॅस वरती एक तवा ठेवायचा आणि त्यावरती बिर्याणीचा गंज ठेवायचा म्हणजे बिर्याणीला दम छान बसतो व बिर्याणी जळत नाही. बिर्याणीला दम देत असताना गॅस एकदम कमी करून ठेवायचा.
स्टेप १६)- दम बिर्याणी तयार होण्यासाठी अर्धा ते पाऊण तास दम येऊ द्यायचा आहे. बिर्याणी प्लेट मध्ये सर्व करताना बिर्याणी मिक्स कराची नाही ते भांड्याचा एका साईडने काढून वाढायची.