उकडीचे मोदक रेसिपी / Ukadiche Modak Recipe In Marathi

 उकडीचे मोदक रेसिपी / 

Ukadiche Modak Recipe In Marathi

 

            उकडीचे मोदक अगदी सोप्या पद्धतीने आज आपण गणेश चतुर्थी विशेष उकडीचे मोदक बनवणार आहोत.  उकडीचे मोदक बनवण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते परफेक्ट कसे तयार होणार त्याचं माप किती घ्यायचं सारण किती घ्यायचं हे सगळं तुम्हाला आज मी सांगणार आहे. उकडीचे मोदक शक्यतोवर आपण गणेश चतुर्थी मध्ये बनवतो पण खूप जणांचे उकडीचे मोदक परफेक्ट बनत नाही ते तुटून जातात त्यासाठीच आपण आज परफेक्ट उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe) बनवणार आहोत.
         उकडीचे मोदक खायला खूपच रुचकर आणि जिभेवर विरघळून जातात. उकडीचे मोदक खायला सगळ्यांनाच खूप आवडते आणि याची आठवण आपल्याला जास्त गणेश चतुर्थी मध्ये येते. चला तर मग आता बनवूया उकडीचे मोदक उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य
साहित्य :-
1) अडीच कप तांदळाची पिठी
2) अडीच कप किसलेला नारळ
3) सव्वा कप गुड
4) एक चमचा खसखस
5) साजूक तूप
6) वेलची पूड
7) ड्रायफ्रूट
8) जायफळ
9) केशर 
१०) दूध
कुकिंग ची पद्धत :- 
१ आता आपण उकडीचे मोदक बनवण्यासाठी उकड कशी तयार करायची ते बघणार आहोत. सर्वात आधी तांदूळ छान स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आणि ते चाळणीवर काढून घ्यायचे आणि नंतर कॉटनच्या किंवा सुती कपड्यावर पसरवून रात्रभर वाळू द्यायचे. 
२. तांदूळ छान वाढले की ते गिरणीवरती दळून आणायचे त्याची पिठी तयार करायची पिठी तयार करत असताना ही तांदळाच्या पिठावर दडली जावी याकडे लक्ष द्यायचं. त्यामुळे त्याच्यामध्ये दुसरा पीठ मिक्स होत नाही आणि तांदळाचे पीठ छान पांढरा राहतो.  
३. आता आपण उकड काढायला घेऊ उकड काढण्यासाठी एका गंजामध्ये अडीच  कप पाणी गरम करायला ठेवावे पाणी गरम झाला की त्यामध्ये अडीच कप तांदळाची पिठी मिक्स करून घ्यायची मिक्स करून झाली कि गॅस बंद करून ती तशीच पंधरा मिनिटे झाकून ठेवायची.
४. तोपर्यंत आता आपण सारण तयार करून घेऊ सारण तयार करण्यासाठी गॅस वरती एक कढई ठेवायची कढईमध्ये एक चमचा खसखस भाजून घ्यायचे. खसखस भाजून झाली की ती काढून ठेवून थोडासा कढईमध्ये तूप घालून त्यामध्ये अडीच कप नारळाचा कीस घालून परतून घ्यायचा.
५. नारळाचा किस थोडा लालसर होईपर्यंत परतून झाल्यानंतर त्यामध्ये पाव कप गूळ घालायचा आणि चांगला परतून घ्यायच याला पाच मिनिटे तरी छान परतून घ्यायच थोडावेळ परतून झाल्यानंतर त्यामध्ये भाजलेली खसखस टाकायची आणि परतून घ्यायच.
६. खसखस टाकून झाल्यानंतर त्यामध्ये थोडी वेलची पूड टाकून परतून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट बारीक करून घालायचे. आणि नंतर छान परतून घ्यायचा आणि त्यामध्ये नंतर थोडी जायफळ किसून त्यामध्ये टाकायचे आणि सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायच.
७. आता जो आपण उकड तयार केलेली आहे ते एका  मध्ये भांड्यामधे काढून घ्यायच आणि त्याला  हाताने छान मळून घ्यायच. त्याचा घट्टसर गोळा होत पर्यंत छान मोडून घ्यायचं उकड छान मळून झाली की त्याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे. बोटाला थोडासा तूप लावून घ्यायचा आणि उकडच्या पिठाचा गोळा घेऊन हातावर गोल गोल करायचा आणि त्याला थोडासा दाब द्यायचा आणि कोरपाटावरती गोल पुरी लाटतो तसं लाटून घ्यायच.
८. गोल पुरी लाटून झाल्यानंतर त्याचे मोदक तयार करायला घ्यायचे म्हणजेच हाताने त्याच्या साईट साईडने पाकळ्या तयार करायच्या त्याचे कोणटे  बोटाने दाबायचे म्हणजे त्याच्या पाकळ्या तयार होतात. गोल गोल पाकळ्या तयार झाल्या की त्यामध्ये सारण भरायचं. सारण भरून झाला की नंतर वरून त्याच्या कडा बंद करायच्या आणि साईडने ते पाकळ्यांचा आकार तयार करायचा म्हणजे आपल्या सुंदर असे मोदक तयार होतात.
९. मोदक वाफवून घेण्यासाठी एका स्टीमर मध्ये पाणी गरम करायला ठेवायच आणि वरच्या भांड्यामध्ये सुती कापड ठेवून त्यामध्ये तयार केलेले उकडीचे मोदक ठेवायचे आणि स्टीमरचा झाकण बंद करून त्याची वाफ काढून घ्यायची.
१०. आधीच अर्धी वाटी दूध गरम करून त्यामध्ये केशर घालून ठेवायचा जेव्हा आपण उकडीचे मोदक स्टीमर मध्ये ठेवतो तेव्हा एक एक केशर त्या मोदकावर ठेवायचा म्हणजे त्याला रंग खूप सुंदर येतो आणि एक एक थेंब मोदकावरती केशर दूध सोडायचा म्हणजेच त्याला रंग खूप सुंदर येतो आणि ते चवीलाही खूप छान वाटतात.
११. आता मोदकांना दहा ते पंधरा मिनिटं स्टीमर मध्ये स्टीम होऊ द्यायचं आणि नंतर पंधरा मिनिटानंतर त्याचा झाकण खोलून त्याला थोडं थंड होऊ द्यायचं आणि नंतर एका प्लेट वरती काढून घ्यायचे झाले आपले उकडीचे मोदक तयार.

Leave a comment