Skip to content
अळूवडी ची रस्सा भाजी आणि अळूवडी
आज आपण अळूवडी कशी बनवतात ते बघू आणि त्याची चमचमीत रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. अळूच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम लोह असते. अळूच्या पानाची वडी खायला खूप रुचकर वाटते. आणि खूप जणांना आवडते अळूच्या पानाची वेळी पौष्टिक असते आणि खायला पण खूप खमंग वाटते आणि अळूवडीपासूनच आपण त्याची रस्सा भाजी तयार करणार आहोत.
अळूवडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
1)- दहा अळूची पाने
2)- अर्धी वाटी बेसन
3)- दोन चमचे तीळ
4)- चिमूटभर ओवा
5)- थोडीशी चिंच
6)- गुडाचा तुकडा छोटासा
7)- पाव चमचा हळद
8)- अर्धा चमचा तिखट
9)- अर्धा चमचा मीठ
अळूच्या पानाची वडी बनवण्याची पद्धती
स्टेप 1)- सर्वात आधी एका वाटीमध्ये चिंच आणि गूळ मिक्स करून त्यामध्ये पाणी घालून ठेवायचं . नंतर एका बाऊलमध्ये अर्धी वाटी बेसन घ्यायचा.
स्टेप 2)- बेसनामध्ये दोन चमचे तीळ टाकायचे थोडासा ओवा हातावर चोडून टाकायचा त्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा तिखट अर्धा चमचा मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा.
स्टेप 3)- व्यवस्थित मिक्स करून झाल की त्यामध्ये चिंच गुळाचे पाणी घालून ते मिश्रण फेटून घ्यायचं खूप पातळ करायचं नाही थोडा घट्टसरच भिजवून घ्यायचा.
स्टेप 4)- अळूची पाने छान व्यवस्थित धुऊन घ्यायचा आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे.
स्टेप 5)- पाने छान पुसून झाली की त्याचे देठ कापून घ्यायचे आणि पानावरच्या रेषा थोड्या थोड्या काढून घ्यायच्या.
स्टेप 6)- गॅस वरती एका गंजामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं किंवा स्टीमर असेल तर स्टीमर मध्ये पाणी गरम करायला ठेवायच.
स्टेप 7)- नंतर पान उलटा ठेवून त्याला मिक्स केलेला बेसन थोडा थोडा लावून घ्यायचा आता जो आपण पान उलटा ठेवला आहे त्याच्या विरुद्ध दिशेने दुसरा पान ठेवून त्यावर बेसनाचा लेप लावून घ्यायचा.
स्टेप 8)- अशाप्रकारे तीन ते चार पाने एकावर एक ठेवून लेप लावून त्याला गोल गोल गुंडाळून घ्यायचा.
अशाप्रकारे तीन तीन पानांना लेप लावून गोल गोल गुंडाळून घ्यायचे तीन ते चार रोल तयार झाले.
स्टेप 9)- आता आपण जो पाणी गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि त्या गंजावर ठेवायचं आणि त्या चाळणीमध्ये गुंडाळलेले रोल वाफवून घ्यायचे.
स्टेप 10)- पंधरा मिनिट झाल्यानंतर व्यवस्थित वाफवून झाले की नाही ते चेक करून घ्यायच. आणि सुरी टाकून पाहायाच सुरीला काहीच चिकटलेला नसेल म्हणजे आपले व्यवस्थित वड्या टाकलेल्या आहेत नाहीतर थोडा वेळ पुन्हा त्याला वाफवू द्यायचा.
स्टेप 11)- वाफवून झालेल्या वड्या थंड करायला ठेवायचा थंड झाल्यानंतर त्याचे गोल गोल काप करून घ्यायचे.
स्टेप 12)- गॅस वरती कढई ठेवायची त्यामध्ये थोडासा तेल टाकायचा आणि तेल गरम होऊ द्यायचा तेल थोडा गरम झाला की त्यामध्ये कापलेल्या गोल वड्या त्या तेलामध्ये जेवढ्या मावणार तेवढ्याच टाकायच्या.
स्टेप 13)- तेलामध्ये वड्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आलटून पालटून दोन्ही साईडने वड्या व्यवस्थित तळून झाल्या की त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं.
स्टेप 14)- अशाप्रकारे सर्व वड्या तेलामध्ये तळून घ्यायच्या.
आता आपण रस्सा बनवण्याची पद्धत पाहू
साहित्य:- 1)- दोन कांदे
2)- एक टमाटर
3)- खोबऱ्याचा तुकडा
4)- एक चमचा तीळ
5)- एक चमचा धने
6)- अर्धा चमचा जिरा
7)- सहा ते सात लसूण पाकळ्या
8)- छोटा अद्रक चा तुकडा
9)- गरम मसाला
10)- कोथिंबीर
स्टेप 1)- रस्सा बनवण्यासाठी सर्वात आधी दोन कांदे कापून घ्यायचे गॅस वरती कढई ठेवून त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचा.
स्टेप 2)– दोन कांदे कापून घ्यायचे तेल गरम झाल की त्यामध्ये कांदे परतून घ्यायचे त्यामध्ये खोबऱ्याच्या तुकड्याचे काप करून घ्यायचे आणि कांद्यासोबतच परतून घ्यायचा .
स्टेप 3)- खोबऱ्याचे काप परतून झाले की त्यामध्येच थोडेसे तीळ एक चमचा धने अर्धा चमचा जिरे सहा ते सात लसूण पाकळ्या आणि छोटासा अद्रक चा तुकडा टाकून परतून घ्यायचा हे सर्व मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा.
स्टेप 4)- सर्व मसाला मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचा. मसाला बारीक वाटून झाल्यानंतर एका वाटीमध्ये काढून ठेवायचा आणि एक टमाटर ची मिक्सरमध्ये प्युरी तयार करून घ्यायची.
स्टेप 5)- नंतर गॅस वरती एक कढई ठेवून त्यामध्ये तीन ते चार टेबलस्पून तेल टाकायचा तेल गरम झाला की त्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला टाकायचा आणि छान परतून घ्यायचा.
स्टेप 6)- मसाला परतून झाला की त्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकायचे आणि छान परतून घ्यायचा नंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद ,एक ते दीड चमचा तिखट चवीनुसार मीठ टाकून छान परतून घ्यायचा.
स्टेप 7)- सर्व मसाला परतून झाला की त्यामध्ये गरम मसाला टाकायचा आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा तेल सुटायला लागला की त्यामध्ये आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढा पाणी सोडायचा.
स्टेप 8)- भाजीला एक उकळी आली की त्यामध्ये तळलेल्या अळूवडी टाकायच्या अर्ध्या अळूच्या वड्या अशाच खाण्यासाठी ठेवायच्या आणि अर्ध्या भाजीमध्ये टाकायच्या आणि त्याला एक उकळी येऊ द्यायची.
स्टेप 9)- भाजीला उकळी आली की गॅस बंद करायचा आणि भाजी वरती कोथिंबीर टाकायची आपण हे अळूवडी भाकरी सोबत ,चपाती सोबत ,भातासोबत खाऊ शकतो आणि खायला खूप रुचकर वाटते.
टीप:-
अळूवडी बनवताना आपण गंजामध्ये पाणी गरम करून चाळणीला तेल लावून त्याच्यामध्ये वाफवून घेऊ शकतो किंवा आपण स्टीमर चा वापर करून त्यामध्ये पण वढ्या वाफवून घेऊ शकतो.