गावरान झणझणीत मच्छी करी रेसिपी (Fish Kari recipe in Marathi)

  गावरान झणझणीत मच्छी करी रेसिपी

(Fish Kari recipe in Marathi)

          आज आपण गावरान पद्धतीने झणझणीत अशी मच्छी करी रेसिपी बनवणार आहोत मच्छी खूप जणांना खूप आवडते. नदीची मच्छी तर खायला खूप छान वाटते त्याची चव खूप छान असते आणि मच्छी ही खूप पौष्टिक सुद्धा असते त्यामध्ये विटामिन डी चे प्रमाण भरपूर प्रमाणात असते त्यामुळे लहान मुलांना तर ती खूप फायद्याचे असते आणि मच्छी नरम असल्यामुळे लहान मुलांना पचायला सुद्धा खूप हलकं आणि लहान मुलेच काय तर मोठी माणसे सुद्धा मच्छी आवडीने खातात आणि मच्छी हे भातासोबत भाकरी सोबत खायला खूप अप्रतिम वाटते मच्छी म्हणजेच मच्छी पेक्षा मच्छी करी मच्छीची करी सुद्धा खूपच त्याची चव अप्रतिम लागते. तुम्ही सर्वांनी सुद्धा एकदा तरी मच्छी करी बनवून बघायलाच हवी आणि ही रेसिपी बनवायला सुद्धा खूप सोपी आहे आणि आज आपण ही रेसिपी खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहोत त्यामुळे कोणी जर पहिल्या वेळेस सुद्धा बनवत असतील तरीही रेसिपी बनवू शकतात. आणि मच्छी घेऊन आणताना मच्छी खूप मोठी पण नाही खूप छोटी पण नाही असं मध्यम आकाराची त्याचे काप करून आणायचे. मध्यम आकाराची मच्छी चवीला खूप अप्रतिम वाटते. मच्छी मध्ये विटामिन टी चे प्रमाण भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपली हाडे मजबूत होतात आणि आठवड्यातून एकदा तरी मच्छी खायलाच हवी. चला तर आता बघूया आपण मच्छी करी कशी बनवायची. 
मच्छी करी बनवण्यासाठी लागणारे साहित्य 
साहित्य:- 
           1) एक किलो फिश 
           2) एक टोमॅटो 
           3) एक कांदा 
           4) सात-आठ लसूण पाकळ्या 
           5) तीन चमचे धने 
           6) कोथिंबीर 
           7) खोबरा 
           8) खसखस 
           9) अद्रक 
मच्छी करी बनवण्याची कृती 
कृती:-
1) मच्छी करी बनवण्यासाठी मच्छीला सर्वात आधी त्याच्यावरती मीठ टाकून ठेवायचं मीठ टाकल्यानंतर त्याला स्वच्छ करून घ्यायचं. 
2) नंतर सर्वात आधी मसाला तयार करून घ्यायचा त्यासाठी एक मोठा कांदा कापून घ्यायचा आणि खोबरा या दोन्हींना तव्यावरती थोडा भाजून घ्यायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं.
 3)नंतर तव्यावरती धने खसखस थोडेसे परतून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे नंतर मिक्सरमध्ये लसूण पाकळ्या आणि अद्रक टाकायचा आणि मिक्सरमध्ये सर्व मसाला बारीक करून घ्यायचा. 
4)सर्व मसाला बारीक करून झाल्यानंतर आणखी एक छोटा कांदा बारीक बारीक कापून घ्यायचा आणि गॅस वरती एक कढई ठेवायची कढईमध्ये चार ते पाच टेबलस्पून तेल टाकायचा तेल गरम झाला की त्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा.
5)कांदा लालसर व्हायला लागला की त्यामध्ये बारीक केलेला मसाला परतून घ्यायचा मसाला थोडा वेळ परतून झाला की त्यामध्ये एक टोमॅटो कापून टाकायचा टोमॅटो थोडा हलकासा फिरवून घ्यायचा. 
6)त्यामध्ये अर्धा चमचा हळद दोन ते अडीच चमचे तिखट चवीनुसार मीठ टाकून मसाला परतून घ्यायचा मसाल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचा त्यामध्ये थोडा मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला जो लागू नये त्यामध्ये थोडासा पाणी घालून मसाल्यामध्ये टाकायचा म्हणजे मसाला जळणार नाही आणि त्याला छान तेल सुद्धा सुटतो. 
7)मसाल्याला व्यवस्थित तेल सुटायला लागला की नंतर त्यामध्ये फिश फक्त एकदाच फिरवून घ्यायची आणि थोडीशी वाफ येऊ द्यायची तर त्यामध्ये पाणी घालायचं आपल्याला जेवढी मच्छी करीला पाहिजे आहेत थोडा एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आणि अन्याला एक उकळी आली की गॅस बंद करून घ्यायचा.
 8)कारण मच्छी लवकर तयार होते मच्छीला जर जास्त वेळ आपण गॅस वरती ठेवला तर मच्छी फुटून जाते मच्छी करीला जास्त वेळ शिजवावा लागत नाही मच्छी लवकर शिजून तयार होते. 

Leave a comment