सुका चिकन रेसिपी(Sukha Chicken Recipe in Marathi)

      सुका चिकन रेसिपी(Sukka Chicken Recipe in Marathi)

आज आपण सुका चिकन रेसिपी बनवणार आहोत. नानव्हेज खाणाऱ्यांना चिकनचे खूप सारे वेगवेगळे प्रकार आवडतात.म्हणूनच आपण आज वेगळा असा सुका चिकन बनवण्याची पद्धत सांगणार आहे .सुका चिकन तुम्ही असाच प्लेट घेऊन खाऊ शकता .अशाच नानव्हेज प्रेमी साठी हि रेसिपि आहे . चिकन मध्ये खूप सार्‍या वेगवेगळ्या पद्धती आहेत कोणाला चिली चिकन आवडतो तर कोणाला चिकन रस्सा आवडतो तर कोणाला सुका  चिकन आवडतो. तर कधी आपल्या घरी चिकन बिर्याणी बनवली जाते. मी यातलाच एक प्रकार म्हणून  आज सुका चिकन बनवणार आहे . सुका  चिकन बनवण्याची पद्धत खूप साधी आणि सोपी आहे.

चला तर बघूया सुका चिकन रेसिपी
साहित्य:-
1)- एक किलो चिकन
2)- दीड कांदा
3)- कोथिंबीर
4)- घरच्या सुका मसाला
5)-बिर्याणी मसाला
6 -हळद पावडर
7)- लाल तिखट
8)- चवीनुसार मीठ
स्टेप 1)-सुखा चिकन बनवण्यासाठी आधी एक बाऊल घ्यायचा त्यामध्ये एक किलो चिकन टाकायचे.
स्टेप 2)- दीड कांदा आणि कोथिंबीर ची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची.
स्टेप 3)- नंतर ती पेस्ट चिकन मध्ये टाकायची त्याने छान फिरवून घ्यायचा.
स्टेप 4)- त्याच चिकन मध्ये घरचे मसाले भाजून घेऊन त्याचे सुका मसाला तयार करून तो टाकायचा.
स्टेप 5)- आणि त्यामध्ये चिकन बिर्याणी मसाला टाकायचा. 
स्टेप 6)- नंतर त्यामध्ये लाल तिखट हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घालून छान फिरवून घ्यायचा त्याला मॅग्नेट करून ठेवायची गरज नाही
स्टेप 7)- नंतर गॅस वरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये चार टेबलस्पून तेल टाकायचा.
स्टेप 8)- तेल गरम झालं की आपण जो चिकन मिक्स करून ठेवलाय तो टाकून छान फिरवून घ्यायचा आणि चिकन शिजेपर्यंत व्यवस्थित झाकून ठेवायचं.
स्टेप 9)- चिकन शिजली कि ती  फिरवून एका भांड्यामध्ये काढून त्यावर ती कोथिंबीर टाकून सर्व्ह करायची हे सुकी चिकन खायला खूप टेस्टी आणि छान वाटते ती आपण अशीच खाऊ शकतो किंवा भाकरी सोबत किंवा चपाती सोबत खायला खूप छान वाटते.
हे चिकन बनवायला खूप सोपी आहे याची बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे. आणि झटपट तयार होते.

Leave a comment