साबुदाणा वडा रेसिपी (Sabudana Vada Recipe In Marathi)

           साबुदाणा वडा रेसिपी (Sabudana Vada Recipe In Marathi)

 

आपण कधी ना कधी उपास पकडत असतो कोणी हप्त्यातून एक दिवस उपवास पकडतो कोणी चतुर्थी तर कोणी एकादशी श्रावण सोमवार नेहमीचे सोमवार वेगवेगळे उपास पकडल्या जातात मग उपवासाच्या वेळेस आपल्या काही ना काहीतरी फराळ खायचा असतो कधी आपण फराळाचा चिवडा खातो तर कधी साबुदाण्याची खिचडी खातो तर कधी आपल्याला साबुदाणा वडा खाण्याची इच्छा होते आणि वळ्यासोबत चटणी खूप छान वाटते. तर आज आपण साबुदाणा वडा आणि त्यासोबत चटणी पण बनवणार आहोत.
तर आधी आपण साबुदाणा वडा कसा तयार करायचा याचे साहित्य बघून घेऊ
साहित्य:-
1)- एक पाव साबुदाणा
2)- अर्धा पाव शेंगदाणे
3)- तीन आलू
4)- चार-पाच हिरवी मिरची
5)- जीरा
6)- चवीनुसार मीठ
7)- दही
कृती:-
स्टेप 1)- सर्वात आधी एका भांड्यामध्ये साबुदाणा घ्यायचा आणि तो स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा. साबुदाणा स्वच्छ धुऊन झाला की त्यामध्ये थोडा पाणी आणि दही टाकून साबुदाणा फुलण्यासाठी ठेवून द्यायचा.
स्टेप 2) – साबुदाणा चार ते पाच तास तसाच भिजू द्यायचा .चार ते पाच तासानंतर साबुदाणा भिजून तयार झाला की मग तीन आलू कुकर मध्ये उकडण्यासाठी ठेवून द्यायचे कुकरमध्ये आलू लवकर होतात दोन ते तीन सिटी मध्ये आलू उकडून तयार होऊन जातात.
स्टेप 3)- शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि भाजून झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आणि मिक्सर मध्ये जाडसर बारीक करून घ्यायचा.
स्टेप 4)- आता एक वाटा किंवा कोहपरा घ्यायच आणि त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा टाकायच त्यामध्ये उकडलेले आलू कुस्करून टाकायचे आणि शेंगदाण्याचा कूट टाकायच हिरवी मिरची बारीक करून टाकायची.
स्टेप 5)- नंतर त्यामध्ये जीरा चवीनुसार मीठ टाकायचा आणि सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचा.
 सर्व मिश्रण छान मिक्स करून झाला की गॅस वरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये वडे करणे इतके तेल टाकायचं तेल गरम झाल की त्यामध्ये साबुदाण्याच्या भिजवलेला गोळा हातावर घेऊन त्याचे जाडसर वडे बनवायचे आणि तेलामध्ये टाकायच.
स्टेप 6)- वडे तेलामध्ये टाकल्यानंतर ते फिरवण्यासाठी घाई करायची नाही थोडा वेळ ते तसाच राहू द्यायचा आणि नंतर थोड्या वेळानंतर ते दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचे.
दोन्ही साईड ने ते गोल्डन ब्राऊन झाले की एका पेपर वरती किंवा टिशू पेपर वरती काढून घ्यायचे म्हणजे त्याचा जास्तीचा तेल निघून जाणार
तर आता आपले वडे तयार झाले तर आता आपण चटणी कशी तयार करायची याची पद्धत बघून घेऊ.
चटणी तयार करण्याची पद्धती
कृती:-
स्टेप 1)- चटणी तयार करण्यासाठी सर्वात आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजून झाले की त्याची साल काढून घ्यायची.
स्टेप 2)-  नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आणि त्यामध्ये दोन ते तीन हिरवी मिरची टाकायची.
स्टेप3)-  नंतर त्यामध्ये थोडासा दही आणि मीठ घालून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची पेस्ट तयार करून झाल्यानंतर
स्टेप 4)- मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश्रण एका छोट्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्याला फोडणी देण्यासाठी गॅस वरती छोटी कढई ठेवायची.
स्टेप 5)- आणि कढईमध्ये एक टेबलस्पून तेल टाकायचा तेल गरम झाला की त्यामध्ये थोडासा जीरा आणि कढीपत्ता घालून कडक फोडणी चटणी मध्ये टाकायची झाली आपली चटणी तयार
साबुदाणा वडा चटणी सोबत खूप छान वाटतो.
टीप:-
जेव्हा आपण आलू करतो तर भांड्यामध्ये जेव्हा आपण आलो करतो त्याला खूप वेळ लागतो त्यासाठी जर का आपण कुकरमध्ये आलू टाकले आणि त्यामध्ये थोडासा मीठ टाकून कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या केल्या तर आलू लवकर उकडून होतात.

Leave a comment