Skip to content
पौष्टिक गाजर हलवा
( Gajracha Halwa in Marathi )
![](http://sundarmazaghar.com/wp-content/uploads/2025/01/20241205_155809-scaled.jpg)
हिवाळ्यामध्ये गाजर हलवा खूप मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो आणि बनवला सुद्धा जातो. कारण हिवाळ्यामध्ये खूप ताजी ताजी गाजर मिळतात. गाजरचा हलवा लहान मुलांना खूप आवडतो. लहान मुलं खूप आवडीने खातात. जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतो. त्यामुळे आपले डोळे छान राहू शकतात त्यामध्ये विटामिन भरपूर प्रमाणात असते आणि लहान मुलांच्या वाढीसाठी तर हा खूप फायद्याचा असतो गाजर हलवा म्हटला की लहान मुलं खूप मागे लागतात किंवा मलाच बनवून दे आत्ताच पाहिजे आणि हिवाळ्यामध्ये तर लालसर रंगाची गाजर खूप प्रमाणात निघतात आणि आणि ती चवीला पण खूप छान असतात आणि आपण गाजर हलवा हिवाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बनवतो कारण हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात निघतात. त्यासाठी गाजराला बनवण्यासाठी कोणते कोणते साहित्य लागतात ते आपण बघूया.
साहित्य:-
१)अर्धा किलो गाजर
२)एक पाव दूध
३) अर्धा पाव साखर
४) तीन-चार विलायची
५) काजू आणि बदाम
७) तीन चमचे तूप
1)- पौष्टिक गाजर हलवा बनवण्यासाठी आपल्याला अर्धा किलो गाजर बाजारातून छान लाल पाहून घेऊन यायचे नंतर त्यांना स्वच्छ अशा पाण्याने धुवून घ्यायचं.
2)- गाजर ला किसून घ्यायच. किसून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये तूप टाकून गाजराचा कीस परतून घ्यायचा खूप छान त्याचा सुगंध येईपर्यंत परतायचं.
3)- नंतर ते थोडं परतून झाल्यानंतर त्यामध्ये दूध घालायचा दूध घालल्यानंतर तो दूध अर्धा पूर्ण होईपर्यंत शिजू द्यायचं.
4)- नंतर त्यामध्ये साखर टाकायची आपल्याला जेवढा गोड लागेल तेवढं साखर टाकायची. खूप जास्त साखर टाकायची गरज नाही.
5)- नंतर तो पूर्ण दूध आटेपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं नंतर त्यामध्ये आपण थोडी वेलची पूड ड्रायफूट टाकायचं आणि झालं पौष्टिक गाजर हलवा तयार.